March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

भाजपाच्या या बड्या नेत्याला केले अटक

मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. महाराष्ट्र सरकार आणि विरोधी पक्ष यांच्या दरम्यान आरोप प्रत्यारोपाची खेळी चांगलीच रंगली आहे. विरोधी पक्षाचे नेते महाविकास आघाडीच्या सरकारवर सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून टीका करत आहे.

अशातच आता मुंबईतून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी बे.ड्या ठो.कल्या आहेत. मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांना अ.टक करत घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये नेलं आहे.

नुकतंच घटकोपरमधील शितल दामा या महिलेचा गटारात पडून मृ.त्यू झाला होता. महिलेचा गटारात पडून मृ.त्यू झाल्याच्या मुद्द्यावरून किरीट सोमय्या घाटकोपरमध्ये आंदोलन करत होते.

गटारात पडून मृ.त्यू झालेल्या शितल दामा यांच्या मृ.त्यूला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी सोमय्या करत होते.

मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांना आंदोलन थांबवण्यास सांगितलं. मात्र सोमय्या आणि मुंबई पोलिसांमध्ये यावेळी बा.चाबाची झाली. यानंतर मुंबई पोलिसांनी सोमय्या यांना अ.टक करत घाटकोपर पोलीस ठाण्यात नेलं आहे.

किरीट सोमय्या यांनी आंदोलन करण्यापूर्वी सोशल मीडिया वरून आंदोलनाची पूर्व माहिती दिली होती. दुपारी 12 वाजता घाटकोपर मधील चिराग नगर पोलीस स्टेशनबाहेर महिलेच्या कुटुंबासोबत आपण ठिय्या आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यासंबंधीत त्यांनी एक ट्विट केलं होतं.

शितल दामा चा परिवाराला न्याय हवा. आज दुपारी १२ वाजता घाटकोपर पश्चिम चिराग नगर पोलिस स्टेशनच्या बाहेर शीतलच्या परिवारासोबत मी ठिय्या आंदोलन करणार आहे. पोलीसांनी १२ दिवसानंतरही एफ.आय.आर रजिस्टर केला नाही, असं ट्विट सोमय्या यांनी केलं होतं.

दरम्यान, घाटकोपर मधील असल्फा या गावात राहणाऱ्या शितल दामा 12 दिवसांपूर्वी गिरणीवर पीठ आण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, खूप वेळ लोटून गेला तरी शितल घरी न परातल्यानं त्यांच्या कुटुंबाने शोधाशोध सुरू केली. यानंतर शितल यांचा मृ.त.दे.ह पोलिसांना हाजीअली जवळील नाल्यात सापडला.

शितल यांच्या घराजवळच एक बंदिस्त नाला होता. या नाल्याचे कॉंक्रेटचे झाकण उघडे होतं. शितल ज्यावेळी पीठ आणायला गेल्या त्यावेळी मुसळधार पाऊस चालू होता. यामुळे शितल यांचा याच नाल्यात पडून मृ.त्यू झाला असावा, असं शितल दामा यांच्या परिवाराचं म्हणनं आहे.

Leave a Reply