June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पांगरीच्या सरपंचपदी राऊत गटाच्या सौ. रेणुका मोरे बिनविरोध

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी  तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या  पांगरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आ.राजेंद्र राऊत गटाच्या सौ.  रेणुका बाळासाहेब मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Advertisement

Sarpanchpadi Raut group of Pangri Ms. Renuka More

सरपंच सुरेखा लाडे यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंचपद रिक्त होते.सरपंच  पदासाठी मोरे रेणुका यांचा एकच अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी विशाल नलवडे, अध्यासी अधिकारी सिद्धेश्वर चौधरी,तलाठी श्रीकांत  शेळके यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.

निवडीप्रसंगी नुतन सरपंच  मोरे रेणुका,उपसरपंच खवले धनंजय,माजी सरपंच लाडे सुरेखा,ग्रामपंचायत सदस्य गोडसे गणेश , चांदणे अक्षय , जाधव सतीश , धस मिनिषा ,
नारायणकर प्रमिला , काकडे हिराबाई ,
बगाडे मैनाबाई,कुंभार शुभांगी,देशमुख रामभाऊ , बागवान रियाज हे 13 ग्रामपंचायत सदस्य  उपस्थित होते.माळी शैलजा,गाढवे सुवर्णा दोन सदस्य गैरहजर होते.

यावेळी अॅड.अनिल पाटील,विलास जगदाळे,सुहास देशमुख, बाळासाहेब मोरे,शहाजी धस,रामा लाडे,बाबुराव गोडसे,जयंत पाटील,सोमनाथ नारायणकर, विलास लाडे,महादेव माळी, आदी मान्यवर उपस्थित होते.
  निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर नवनिर्वाचित सरपंचांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.कार्यकर्त्यांनी निवडीनंतर फटाके फोडून व पेढे वाटून,गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Leave a Reply