October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सर्वसामान्य लोकांना कायद्याची माहिती असेल तर चांगला समाज निर्माण होतो ;- न्यायमुर्ती एस बी विजयकर

बार्शी :
  सर्वसामान्य लोकांना कायद्याची माहिती असल्यास सर्वत्र कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन चांगला समाज, चांगला गाव, चांगला देश घडतो. आपल्याला चांगला देश घडवायचा आहे म्हणून प्रत्येकाला कायद्याचे, आपल्या हक्कांचे व कर्तव्याची जाणीव असणे आवश्यक आहे असे मत सह दिवाणी न्यायाधीश एस बी विजयकर यांनी व्यक्त केली.तालुक्यातील शेंद्री येथे

Advertisement

तालुका विधी सेवा समिती बार्शी व बार्शी वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात बोलत ते होते.  अध्यक्षस्थानी बार्शी वकील संघाचे अध्यक्ष अँड. अविनाश जाधव हे होते. यावेळी व्यासपीठावर अँड. शंकर ननवरे, अँड. स्वप्नील खंडागळे, सरपंच महादेव चव्हाण, अजीज सय्यद, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.सी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

A better society is created if the common people are aware of the law;- Justice SB Vijaykar

पुढे बोलताना न्यायाधीश एस बी विजयकर यांनी जन्म-मृत्यू नोंदी व  कायद्यातील तरतुदीची माहिती दिली. तसेच जेष्ठ नागरिक कायद्यांची माहिती देऊन जेष्ठ नागरिकानी मुलांच्या नावावर जरी आपली संपत्ती केली असेल व पुढे मूल त्यांचा सांभाळ करत नसतील तर ती संपत्ती परत आपल्या नावावर करता येते कायद्यात तशी तरतूद असल्याचे सांगितले. त्याच प्रमाणे मूल सांभाळ करत नसतील तर जेष्ठ नागरिक मुलांकडून पोटगीची मागणी करू शकतात याची माहिती दिली.

ज्या प्रमाणे कायद्यात प्रत्येकाचे अधिकार आहेत असे सांगितले.
   यावेळी न्यायालयीन कर्मचारी यांनी शेंद्री गावात राष्ट्रीय लोकअदालत, मध्यस्थी केंद्र या बाबतची माहिती पत्रके वाटून जनजगृती केली.

Leave a Reply