बार्शी तालुका पोलीसांची कामगीरी,दरोडा व घरफोडी गुन्हा उघडकीस आणून 3 कुख्यात आरोपी जेरबंद व 4,16,000/- रु. चा मुद्देमाल हस्तगत
बार्शी;- महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी तालुका पोलीस ठाणे हददीत दिनांक 23/10/2022 रोजी पहाटे 03/00 वा. चे सुमारास यातील फिर्यादी, त्यांची पत्नी असे घरात झोपले असताना अनोळखी चोरट्यांनी घराचे पाठीमागील दरवाजा कटावणीने उचकटून 3 चोरट्यांनी आत प्रवेश करून फिर्यादी यांचे भाऊ व वडील यांचे रुमला बाहेरून कड्या लावुन फिर्यादीच्या रुमचा दरवाजा कटावणीने उचकटून आत प्रवेश करुन फिर्यादीच्या गळ्याला लोखंडी सत्तुर लावुन जबरदस्तीने कपाटातील व पत्नीच्या अंगावरील 13 तोळे 1.5 ग्रॅम (दिड ग्रॅम वजनाचे 5,26,000 रु. किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहे म्हणुन बार्शी तालुका पोलीस गु.र.नं. 294/22 भादवि कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
The performance of Barshi Taluka Police, by exposing the crime of robbery and burglary, 3 notorious accused were imprisoned and 4,16,000/- Rs. Seized the issue
त्याचप्रमाणे सदर गुन्ह्याचे फिर्यादी यांचे शेजारी असलेल्या घराचा पाठीमागील दरवाजा अज्ञात चोरट्यानी कटावणीने उचकटून आत प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले 5 तोळे 8.5 ग्रॅम वजनाचे सोन्प्रचे दागीने एकुण 2,34,000/- रु. चे चोरून नेले म्हणून सदर बाबत गु.र.नं. 295/ 22 भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दिनांक 23/10/2022 रोजी दाखल आहे सदर चोरीच्या घटनामुळे मा. पोलीस अधिक्षक सो सोलापुर ग्रामीण व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो, बार्शी
विभाग बार्शी यांनी सदर गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्ह्याचे तपासिक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक महारुद्र परजने व पोसई प्रविण जाधव यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणे करिता वेगवेगळे पोलीस पथक तयार करून त्यांना योग्य त्या सुचना देवुन, तसेच गोपनीय बातमीदारांमार्फत व तांत्रीक बाबींचा तपास करून सदरचा गुन्हा हा आरोपी 1) सुनिल उर्फ काळ्या श्रावण शिंदे रा. सुंभा ता. जि. उस्मानाबाद सध्या रा. काकानगर, सांजारोड, उस्मानाबाद जि. उस्मानाबाद 2 ) रवि उर्फ झोक्या अरुण काळे, रा. देगाव ता. मोहोळ जि. सोलापूर 3) किरण अरुण पवार रा. राळेरास ता. बार्शी जि. सोलापूर यांनी केला असल्याची माहीती प्राप्त झाल्याने सदर आरोपी यांचा उस्मानाबाद, पूणे व सोलापूर जिल्ह्यात अरोपी यांचा शोध घेवुन सदरचे आरोपी यांना मोठ्या शिताफीने पकडून त्यांचेकडे गुन्ह्याचा तपास केला असता सदर आरोपी यांनी व त्यांचे इतर आणखीन साथीदार यांचे मदतीने गुन्हा केला असल्याची कबूली दिली. त्यामुळे आरोपी क्र. 1 ते 3 यांना अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता आरोपी यांना पोलीस कोठडी मंजूर केल्याने पोलीस कोठडी मुदतीत तपास करुन आरोपी यांचेकडून वरील दोन्ही गुन्ह्यातील 9 तोळे 1.5 ग्रॅम सोन्याचे दागीने एकुण किंमत रु. 3,66,000/- रु. चा मुद्देमाल व गुन्ह्यातील वापरलेली एक मोटर सायकल व हत्यार जप्त करण्यात आले आहे. आरोपी यांनी गुन्ह्यात वापरलेल मोटर सायकल ही चोरीची असल्याची संशय आल्याने सदर बाबत तपास केला असता मोटर सायकल सोलापूर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 829 / 22 भादवि कलम 379 या गुन्ह्यातील चोरीची असल्याची माहीती प्राप्त झाली आहे. इतर आरोपी यांचा शीघ्र गतीने शोध चालू असून त्यांना लवकरच अटक करीत आहोत.
जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल व पो.नि सुहास जगताप, सपोनी महारुद्र परजने, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, पोहेकॉ/राजेंद्र मंगरुळे, पोहेकॉ /सहदेव देवकर, पोहेकॉ / सुभाष सुरवसे, पोहेकॉ / रियाज शेख, एएसआय ठोंगे, पो.ना/अमोल माने, पो.ना/ उंदरे, पोकॉ/ धनराज फत्तेपूरे, पोना/धनराज केकाण, पोना/महेश डोंगरे, पोना/अभिजीत गाटे, पोहेकॉ / तानाजी धिमधिमे, पोना/विलास भराटे, पोहेकॉ / गोरख भोसले, पोना / आप्पासाहेब लोहार, पोकॉ/बळी बेदरे, चापोकों/वैभव भांगे, चापोका/समीर पठाण, पो.कॉ / रतन जाधव सायबर सेल यांनी गुन्हयाची कामगिरी बजावली आहे.