बार्शीत चौघे तरूण अटक
बार्शी;- महाराष्ट्र स्पीड न्युज
ए.टी.एम सेंटर जवळ थांबुन लोकांना तुमचे पैसे पडले आहेत असे भासवुन खाली नोटा टाकुन त्यांच्या गाडीला अडकवलेली किंवा गाडीत ठेवलेली पैशाची बॅग चोरून घेवुन पळुन जाणारी टोळी जेलबंद करण्यात बार्शी शहर पोलीसांना यश आले असुन याप्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे.
Four youth arrested in Barshit
दि. १५ जुन २०२२ रोजी बजरंग नागनाथ जाधव वय ७० वर्षे रा. ३५१५ राउळ गल्ली बार्शी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तेलगिरणी चौकातील मिरगणे कॉम्प्लेक्स शेजारी असलेले सेंट्रल बँक ऑफ इंडीया या बँकेत FD वर कर्ज काढणेसाठी ते गेले असता त्यांनी तेथुन ५०,००० रुपये रोख रक्कम काढली होती. तेथुन घरी जाताना फिर्यादीचे समोरुन दोन अनोखळी व्यक्ती आल्या व त्यातील एका व्यक्तीने फिर्यादीचे दंडास धक्का देवुन तुमचे पैसे पडले आहेत असे म्हटले. फिर्यादीने गाडीवरुन उतरुन गेटच्या आत येवुन पाहीले असता फिर्यादीस तेथे शंभर रुपयाची एक नोट व विस विस च्या नोटा पडलेल्या दिसल्या. सदरच्या नोटा घेण्यासाठी फिर्यादी खाली वाकून नोटा घेवुन दुचाकीकडे आले असता त्यांनी दुचाकीच्या पुढील बाजुला अडकवलेली कागदी पिशवी पाहीली असता ती तेथे दिसली नव्हती. अज्ञात चोरट्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहर पोलिसांनी तपास करूण राजेश रामलाल साळुंखे वय ६० वर्षे रा. शुक्रवार पेठ खर्डा ता. जामखेड जि. अहमदनगर ,बन्सी उमाजी भोसले वय ५८ वर्षे रा. चिचोंडी पाटील ता. जि. अहमदनगर , आकाश हुकुम बडगुजर वय ३५ वर्षे रा. नवा माँडा परळी ता. परळी जि. बिड व जयेंद्र दिलीप परमाळ वय २७ वर्षे रा. माळी वाडी ता. जि. यांना तेलगिरणी चौकातील मिरगणे कॉम्प्लेक्स शेजारी असलेले सेंट्रल बँक ऑफ इंडीया येथुन ताब्यात घेतले. असता घटनेचे गंभीय लक्षात घेवुन त्यांना पोलीस ठाणेस आणुन चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली तसेच अशाचे प्रकारचे गुन्हे पंढरपुर , टेभुंर्णी, बिड जिल्ह्याच्या हद्दीत केल्याची कबुली दिली आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे,अतिरिक्त पोलीस प्रमुख हिम्मत जाधव,
उपविभागीय पोलीस अधिक्षक जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. आण्णासाहेब मांजरे, सपोनि सुधीर तोरडमल, सपोफौ अजित वरपे, शैलेश चौगुले पोना मनिष पवार, ज्ञानेश्वर घोंगडे, अविनाश पवार, सचिन देशमुख, अंकुश जाधव,वैभव ठेंगल,
यांनी केली आहे.