October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

उक्कडगांव येथे शहिद जवान अनिल सानप यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

बार्शी;- महाराष्ट्र स्पीड न्युज
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील बोरघाटात इर्टिका व कंटेनर यांच्यात झालेल्या भिषण अपघातात गंभीर जखमी होऊन शहिद झालेल्या बार्शी तालुक्यातील उक्कडगांव येथील भारतीय नौसेनेमधील जवान अनिल सुनील सानप वय ३१ यांच्यावर आज शनिवारी दि.१९ रोजी सकाळी ९ वाजता त्याच्या मुळ उक्कडगांव गावात शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात हजारो देशप्रमींच्या उपस्थितीत जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडुण सलामी देत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. लहान भाऊ अरूण सानप याने आपल्या भावाच्या पार्थिवाला रडत रडत भडाग्नी दिला.त्यावेळी उपस्थितांचेही डोळे पानावले. अणेकांनी आपल्या आश्रुना मोकळी वाट करून दिली.

Advertisement

Martyred jawan Anil Sanap cremated in a mournful atmosphere at Ukkadgaon
  @यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल,पांगरीचे सपोनी नागनाथ खुने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, सरपंच सविता घुले,उपसरपंच गणेश हागवणे,पोलिस पाटील नितिन वाघमारे,नौसेनेचे अधिकारी मयुर कोल्हे,भरत यांच्यासह जवानाची आई चंद्रकला,वडील सुनील,पत्नी सविता,अवघ्या सहा वर्षाचा मुलगा अंशुमन आदी उपस्थित होते.
@@ शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शहिद जवान अनिल सानप यांचे पार्थिव उक्कडगांव येथे एका रूग्वाहिकेतुन गावात आणण्यात आले.पार्थिव ग्रामपंचायत कार्यालयासमोर काही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर मधुन पार्थिवाची गावातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.नंतर जवान सानप यांचे पार्थिव काही वेळ घरासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.त्यानंतर जय जवान जय किसान, अमर रहे अमर रहे शहिद जवान अनिल सानप अमर रहे,विर जवान तुझे सलाम अशा गगनभेदी घोषणांच्या निनादात शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अंत्ययात्रा काढण्यात आली.सजवलेल्या वाहनावर पुष्पवृष्टी करण्यात आली.


नियोजित अंत्यविधी ठिकाणी पार्थिव आल्यानंतर मान्यवरांसह ईतरांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.नौसेनेच्या  जवानांनी  हवेत बंदुकीच्या फैरी झाडत आपल्या लाडक्या सहकारी जवानाला सलामी अर्पण केली. प्रेमळ व जिवाला जिव देणारा मित्र गमावल्याच्या प्रतिक्रिया मित्राकडून व्यक्त केल्या जात होत्या.
@शहीद अनिल सानप यांच्या पश्चात आई, वडील , पत्नी , मुलगा ,  भाऊ , असा परिवार आहे.

अनिल सानप हे २०१२ मध्ये पुणे येथे झालेल्या भरती प्रक्रियेत नौसेनेत भरती झाले होते.ओरिसा,विशाखापट्टणम, लोणावळा येथे सेवा बजावली. ते सध्या मुंबईत नौसेनेत सेवा बजावत होते.दरम्यान ते काल दि.१८ नोव्हेंबर रोजी एक दिवसाची रजा घेऊन मेडिक्लेमची कागदपत्र देण्यासाठी पुणे येथे आले होते.पुणे येथील कामकाज आटोपून ते खाजगी प्रवासी वाहनाने मुंबई येथे कामावर हजर होण्यासाठी जात असताना त्याचा अपघात होऊन गंभीर जखमी झाल्याने ते शहिद झाले.

  शहिद जवान सानप   यांचे प्राथमिक शिक्षण गावात झाले. पहिली ते  ८ वी पर्यंत चे शिक्षण खामगाव आश्रमशाळेत तर ,८ वी ते१० वी शिक्षण गावातील सरस्वती विद्या मंदिर प्रशालेत झाले .त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पांगरी येथे झाले.भरती होण्यापुर्वी सानप यानी रोजंदारीवर मजुरी करत आर्थिक परिस्थितीवर मात करून ते सैन्यात दाखल झाले.

Leave a Reply

disawar satta king