मोठा दिलासा! कोरोणाला रोखण्यासाठी भारतात लसीकरण केव्हा सुरू होणार ?सरकारने दिले संकेत
ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनेकाकडून विकसित केली जात असलेली कोरोना लस कोविशील्ड ही लवकरात लवकर उपलब्ध होऊ शकते. या लसीचे फेस ३ मधील ट्रायल सुरू आहे. साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकते. नीती आरोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सगळ्या प्रकारच्या चाचण्या या सुरळीत सुरू आहेत. भारत बायोटेक आणि कॅडिला हेल्थकेअर ज्या लसींवर चाचण्या करत आहेत. त्या लसी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत उपलब्ध होऊ शकतात. पुढच्यावर्षी लसीकरणाला सुरूवात होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सरकारने दिलेल्या माहितीनुसार लसीवर पूर्णपणे अवलंबून नसून इतर अनेक उपायांवरही भर दिला जात आहे.
एकापेक्षा जास्त लसींचा वापर भारतात होणार
जसजशा सुरक्षित आणि प्रभावी लसी उपलब्ध होतील तसतसं लसीकरण अभियानात सहभागी करून घेतलं जाणार आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांन मागील काही दिवसात दिलेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षाच्या सुरूवातीपर्यंत देशात लस उपलब्ध झालेली असेल. भारतात ज्या लसींची चाचणी होत आहे. त्या लसी पुढच्या वर्षी पहिल्या तीन महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत उत्पादनासाठीही उपाययोजना केल्या जात आहेत. ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनेका आणि भारत बायोटेकची लस डबल डोजची लस असून कँडीलाचे तीनवेळा लसीकरण केलं जाईल.
व्हायरसच्या स्वरुपात बदल झाल्यास लस निष्क्रीय ठरू शकते
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे प्रमुख डॉ बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरसच्या स्वरुपात बदल झाल्यास लसीची परिणामकता कमी होऊ शकते. डॉ. पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीला अधिकृत परवानगी मिळाल्यानंतरही उपलब्ध होण्यासाठी उशिर लागण्याची शक्यता आहे. कोरोना लसीच्या वितरणासाठी आलेला खर्च सरकार शर्यंत लावून वसूल करणार नाही. सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोरोना लस विकत घेण्याासठी पर्याप्त फंड सरकारकडे आहे. जसजश्या लसी उपलब्ध होत जातील तसतसं आर्थिक गरजा वाढत जातील. सरकारने एका डोजची किंमत १ डॉलर ठेवण्याचा विचार केला आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, एकदा लस सुरक्षित आणि परिणामकारक ठरत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर किंमत निश्चित केली जाईल.