March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

राजाभाऊ साठी आम्ही बेअरर चेक ;-उपमुख्यमंत्री फडणवीस

बार्शी;-(गणेश गोडसे)

आम्ही राजाभाऊ राऊत यांच्यासाठी बेरर चेक असुन शहर व तालुक्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडु दिली जाणार नाही.जनतेसाठी २४ तास काम करणारा लोकप्रतिनिधीं तुम्ही निवडला असुन सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असेल,विकासाला  निधी कमी पडु दिला जाणार नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.ते आज  शुक्रवारी दि.४ रोजी बार्शीत शहर व तालुक्याच्या विकासाला भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. राजेंद्र राऊत यांच्या वतीने आयोजीत त्यांचा नागरी सत्कार व विविध विकास कामाच्या शुभारंभ व लोकार्पण व नागरी सत्कार सोहळ्यास उत्तर देताना बोलत होते.

Advertisement

We bearer check for Rajabhau ;-Deputy Chief Minister Fadnavis

   @महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटिल अध्यक्षस्थानी होते.यावेळी खा.रणजितसिंह निंबाळकर,आ.शुभाष देशमुख,आ.राजेंद्र राऊत, आ.विजयकुमार देशमुख,आ.सचिन कल्याणशेट्टी, आ.प्रशांत परिचारक,आ.राणा जगजितसिंह पाटील, आ.राम सातपुते,आ.सुरेश धस आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
     उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की आम्ही ६५ मि.ली.च्या अतिवृष्टीच्या निकषात महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच बदल करूण अतिवृष्टीने नुकसान ग्रस्त शेतक-यांना मदत केली.तिन महिन्यात तब्बल ७ हजार कोटीची मदत राज्यातील शेतक-यांना दिली आहे.राज्यातील शेतक-यांना दिवसा बारा तास विज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर फिडर योजना पुन्हा नव्याने कार्यान्वित केली जाणार असुन त्याचा लाभ शेतक-यांना नक्कीच होईल.तसेच शेतक-याच्या शेतात सौर उर्जा प्रकल्प उभे करून प्रती हेक्टरी ७५ हजार भाडे दिले जाणार आहे.तिस वर्षाचा करारानंतर जमीन त्या शेतक-यास परत दिली जाईल असेही फडणवीस म्हणाले.

@@तालुक्यातील शेतक-यांना ८५ कोटीच्या लाभाबरोबरच आ. राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्याने तालुक्यात रस्ते,पाणीपुरवठा ,न्यायालयात  इमारत,भुयारी गटार,जलजीवन मिशन आदी योजनेतून मोठा निधी मिळाला आहे.तालुक्यातील उपसा सिंचन, उजनी पाणीपुरवठा आदी योजना तातडीने मार्गी लावल्या जातील.उपसा सिंचन योजनेचे ३५० कोटीचे टेंडर येत्या काही दिवसांत जाहीर होइल. भुयारी गटार योजना पंधरा पंधरा वर्ष रखडते मात्र आ.राजेंद्र राऊत यांनी संघर्ष करूण ही योजना पुर्ण केली.शहर मध्यवर्ती असल्याने लगतच्या अणेक तालुक्यातील लोकांचा वावर या शहरात असतो.

@@आ.राजेंद्र राऊत म्हणाले;—-

तालुक्यातील शेतक-यांना आपल्या आगमनाची बरेच दिवसापासुन प्रतिक्षा होती. तालुक्याच्या विकासाला व अतिवृष्टीने नुकसान  झालेल्या शेतक-यांना निधी उपलब्ध करून दिल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवानी दिवाळी गोड केल्याबद्दल आ.राजेंद्र राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.तसेच भुयारी गटार,भगवंत मैदान,न्यायालय इमारत,घरकुल,शहर व तालुक्यातील अणेक रस्ते,साठवण तलाव,रखडलेली उपसा सिंचन योजना,आदीला मोठी मदत केली असुन अजूनही बार्शीकरांच्या आपणाकडून मोठ्या अपेक्षा असुन त्या अपेक्षा पुर्ण कराव्यात.साठवण तलाव ,बंधारे यासाठी निधी उपलब्ध करून दिला असला तरी तालुका आवर्षण प्रवण असल्यामुळे तालुक्यातील शेतीला पाण्याची तहान आहे. त्यामुळे शेतीला पाणी उपलब्ध करूण द्यावे असेही आ.राजेंद्र राऊत म्हणाले.

@@प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर बार्शी शहर भुयारी गटार योजना लोकार्पण सोहळा,प्रधानमंत्री आवास योजना PMAY अंतर्गत १५९६ घरांचा पायाभरणी सोहळा,महाराष्ट्र राज्य नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजुर ११ रस्त्यांचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

@@नंतर आ.राजेंद्र राऊत व इतरांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चांदीची गदा व भगवंताची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.

@@क्षणचित्रे;- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी भाजपाचे झेंडे लावण्यात आले होते.त्यामुळे शहरात भाजपमय वातावरण निर्माण झाले होते. शहरात अणेक ठिकाणी व प्रवेशद्वारावर स्वगाताचे मोठ मोठ फलक लावण्यात आले होते.
@दुपारी दिड वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांचे जथ्थेच्या जथ्थे वाजत गाजत सभा स्थळाकडे येताना दिसत होते.
@सभास्थळावर हातात भाजपचे ध्वज व गळ्यात भगवे उपरणे घातलेले  हजारो कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते.
@ शहरातील प्रमुख मार्गासह सभास्थळ परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

@शिवशक्ती मैदानावर उभारलेल्या हेलिपॅडवर ३ वाजता आगमन झाल्यावर फडणवीस यांनी डॉ कर्मवीर मामासाहेब जगदाळे हॉस्पिटलच्या सेंट्रल ICU ॲन्ड ट्रामा सेंटर (१०० बेड)ला भेट देऊन पहाणी केली.पहाणी करूण त्यांनी दिलीप गांधी यांचे सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन केले.तेथुन श्री भगवंत मंदिरात जाऊन दर्शन घेऊन फडणवीसांचे ४ वाजता सभा स्थळी आगमन झाले.फडणवीस यांनी १७ मिनीटे उपस्थित जनसमुहाला प्रबोधीत केले.

   @विजय राऊत,माजी सभापती अनिल डिसले,माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी,रमेश पाटील,संचालक रावसाहेब मनगिरे,चेअरमण रणवीर राऊत,सचिन मडके,भाजपा तालुकाध्यक्ष मदन दराडे,दिलिप गांधी,संदेश काकडे,दिपक राऊत, विजय चव्हाण,
,सुधिर बारबोले,संतोष निंबाळकर,राहुल मुंढे,राजेंद्र सुरवसे,महेश करळे,केशव घोगरे,श्रीधर कांबळे,बाबासाहेब मनगिरे, भारत पवार,वैभव शिंदे आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन निता देव यांनी केले.

Leave a Reply