बार्शीत महिलेचा ओढणीने गळा आवळून खुन,एकावर गुन्हा दाखल ,आरोपी फरार
बार्शी;- महाराष्ट्र स्पीड न्युज
कामावर जाण्याच्या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये झालेल्या भांडणातून सहकारी महिलेचा एकाने राहत्या घरीच ओढणीने गळा परप्रांतीय महिलेचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार बार्शीतील पंकजनगर भागात घडला.शहर पोलिस ठाण्यात एकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
@मुस्लिमा लुथफार सरदार वय-३५ वर्षे रा.पश्चिम बंगाल असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे.
@बागबुल उर्फ शाकिर हुसैन शेख वय-३८ वर्षे रा.कलबंगा,ता.नाक्षिपारा,जि.नाडिया पश्चिम बंगाल असे खुन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या परप्रांतीयांचे नाव आहे.
मयत महिलेस महाबूर १२ वर्षे व आसिक १० वर्षे दोन मुलं आहेत.मुस्लिमा ही मुळची पश्चिम बंगाल या राज्यातली असून कामाच्या निमित्ताने ती महाराष्ट्रात आली होती.बागबुल उर्फ शाकिर हुसैन शेख हा पश्चिम बंगाल येथील असून मयत महिलेसोबत तो ३ वर्षांपासून राहत होता. बागबूल याने सकाळी मयत महिलेस कामावर जाऊ नकोस असे म्हणून भांडण केले होते. त्यानंतर चार वाजताचे सुमारास बागबुलने मयत महिलेच्या दोन्ही मुलास बाहेर जाऊन खेळण्यास सांगितले होते. थोड्यावेळाने दोन्ही मुले खेळून घरी आल्यानंतर त्यांनी घराचा समोरील दरवाजा वाजवून उघडण्याचा प्रयत्न केला परंतू तो उघडला नाही. खूप वेळ झाला तरी दरवाजा न उघडल्याने त्यांच्यापैकी आसिक हा पाठीमागील दरवाजाकडे गेला असता त्यावेळी दरवाजा उघडा असुन मयत महिला किचनमध्ये खाली पडलेली दिसली व तिच्या गळ्याभोवती ओढणी असल्याचे दिसले. तसेच त्याने समोरील दरवाजा उघडून महाबुर यास आतमध्ये बोलविले व दोघांनी मयत महिलेस उठविण्याचा प्रयत्न केला परंतू आई उठत नसल्याने तसेच बागबुल ही कोठे दिसत नसल्याने त्यांनी त्यांचे घरमालक मिरगणे यांना फोन करून सर्व प्रकार सांगून बोलावून घेतले. महिलेस रूग्णालयात नेले असता मयत घोषित करण्यात आले.
Barshit woman strangled to death, one charged, accused absconding
पोलिसांनी मयत महिलेच्या घरी आलेला बागबुलचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. वैद्यकीय अधिकारी यांनी मयतेची पाहणी केली असता तिच्या हनुवटीखाली तसेच कपळाचे वरील बाजूस केसामध्ये पायावर जखमांचे व्रण दिसत असल्याने प्रथमदर्शनी सदर महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे दिसून आले. फरार बागबूल याच्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार करीत आहेत.