December 8, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

विशाल फटे सह पाच जणाविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल

बार्शी;
दिपक बाबासाहेब अंबारे वय 37 वर्षे धंदा शेती रा. शेळके प्लट, गाडेगांव रोड, बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर मो.नं. 9011004671 मी वरील नमूद ठिकाणी माझे कुटूंबासह राहणेस असून माझी वडीलोपार्जित शेती आहे ती मी पाहत असतो. माझे शिक्षण बी.पी.एड. एम्पी.एड झालेले आहे. तसेच प्लटींग व्यवसायही पाहत असतो. श्री. अंबादास फटे हे बी.पी.सुलाखे कमर्स कलेज येथे प्राध्यापक होते त्यांचा मुलगा विशाल फटे याचे मोहिते कम्प्लेक्स शिवाजी कलेज रोड येथे नेट कफे होते. सन 2019 मध्ये माझी पिक विम्याच्या संदर्भात विशाल अंबादास फटे यांचेशी ओळख झाली त्यानंतर आमचे वारंवार भेटीतून परस्पर मैत्रीचे जिव्हाळयाचे व विश्वासाचे संबंध झाले. त्यावेळी अलका शेअर्स सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून तो शेअर्स मार्केट मध्ये तो त्याचे नावे पैसे गुंतवत असे. शेअर्स मार्केटमधून मिळालेला फायदा तो आम्हाला दाखवित होता. त्याचा फायदा पाहून मी प्रथम 70 हजार रुपये गुंतविले होते त्यातून त्याने मला ब-यापैकी फायदा करुन दिला. त्यामुळे माझा त्याचेवर विश्वास बसला. विशाल फटे याने शेअर्स मार्केट मध्ये रक्कम गुंतवणूक करण्याकरिता वित्तीय आस्थापना विशालका कन्सल्टन्सी सर्विसेस प्रायवेट लिमिटेड, अलका शेअर्स सर्विसेस, जे.एम. फायनान्सीयल सर्व्हिसेस या कंपन्या काढल्याबाबत त्यांनी मला माहिती दिली. या कंपनीमध्ये त्याचे वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे तसेच आर्इ अलका फटे यांच्या नावे त्याने त्या कंपन्या चालू केल्या होत्या.  वरील कंपनीमार्फतीने त्याने शेअर्स मध्ये वेगवेगळया कंपन्यांमध्ये बार्शी तसेच इतर भागातील नागरिकांकडून शेअर्स मार्केट मध्ये शेअर्स घेण्याकरिता मोठया रक्कमा त्याचे वरील कंपन्यांचे खात्यामध्ये घेत असे. त्याकरिता गुंतवणूकदारांना तो आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवित होता. तो काही लोकांकडून आर.टी.जी.एस. मार्फत किंवा चेक मार्फत किंवा रोख रक्कम घेऊन त्याच्या वरील कंपन्या मार्फतीने व्यवहार करत असे. त्याचा व्यवहार कोणत्या पध्दतीने चालू आहे हे कोणास सांगत नसे. फक्त काही वेळेस कोणाला रोख रक्कम दयायची असल्यास माझे एच.डी.एफ.सी. च्या खात्यामध्ये रक्कम जमा करत असे, ती रक्कम मी काढून त्यास ऑफिसला नेवून देत होतो. माझा त्याचेवर विश्वास बसल्याने मी खालीलप्रमाणे त्याचेकडे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याकरिता त्याचे कंपनीमध्ये विश्वासाने गुंतवणूक केली होती. त्याने माझे नावावर डी मट अकाऊंट मार्फतीने व्यवहार केला नाही. त्याचा व्यवहार हा विश्वासावर होता. तो लोकांना पैसे रिटर्न चेकने, किंवा रोख देत असल्याने व माझा मित्र झाल्याने त्याने माझा विश्वास संपादन केला होता. तसेच मला देखील तुझे पैसे मला दे मी तुला जास्त फायदा मिळवून देतो. तसेच तुझे पैसे शेअर्स मार्केट मध्ये विविध प्रकारे गुंतवणूक करुन तुला जास्त नफा मिळवून देतो असे अमिष दाखवून मला त्याच्या वरील वित्तीय कंपनीमध्ये माझी व माझ्या पाहुण्यांची रक्कम गुंतवण्यास विश्वासाने भाग पाडले. विशाल अंबादास फटे हा गुंतवणूकदारांची रक्कम ही शेअर्स मार्केट मधील आय.पी.ओ. ग्रे मार्केट मध्ये गुंतवणूक करीत आहे असे सांगत असे. आय.पी.ओ. महिन्यातून 2 ते 3 वेळा असते. त्यामध्ये 15 ते 20 टक्के नफा होत असतो. त्यामुळे महिन्यास गुंतवलेल्या रक्कमेवर अंदाजे 30 ते 35 टक्के नफा मिळत असलेबाबतची शेअर्स मार्केट मधील अल्गो ट्रेडींग ही नवीन संकल्पना त्याने तयार करुन या ट्रेडींग बद्दल त्याचा भरपूर अभ्यास असल्याचा भासवून त्याने मला माझे नातेवाईकांना तसेच मित्रांना व बार्शी शहरातील व परिसरातील इतर लोकांना ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवून दररोज 2 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे परिसरातील लोकांनी त्याचेवर विश्वास ठेवून मोठया प्रमाणात त्याचे वरील कंपनीमध्ये पैसे गुंतविले होते.  श्री. विशाल अंबादास फटे यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे व त्याच्याशी असलेल्या मैत्रीपुर्ण संबंधामुळे त्यांनी दाखवलेल्या अमीषाला बळी पडून मी माझे स्वत:चे, माझ्या स्वत:च्या सख्या भावाचे व माझ्या नातेवार्इकांच्या नातेवार्इकांकडून हात उसने पैसे घेतले. सदर रक्कमा हया मी शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणूक करणे करिता विशाल अंबादास फटे याच्या वरील नमूद 3 कंपन्याच्या खात्यामध्ये, तसेच त्याच्या वैयक्तीक नावाच्या बचत खात्यामध्ये त्या रक्कमा मी जमा केल्या होत्या. त्याचा तपशील खालील प्रमाणे. अ) मी दिलेल्या रक्कमाअ.क्र.तारिखरक्कम रुपयेखाते112/06/20205,50,000/-अलका शेअर्स सर्विसेस207/10/20204,75,000/-अलका शेअर्स सर्विसेस307/10/20205,00,000/-अलका शेअर्स सर्विसेस421/10/20204,50,000/-अलका शेअर्स सर्विसेस516/12/20218,00,000/-अलका शेअर्स सर्विसेस606/02/20215,00,000/-अलका शेअर्स सर्विसेस712/07/202115,00,000/-अलका शेअर्स सर्विसेसरुपये               45,75,000/-8) रुपये 16,50,000/-माझे घर विक्री करुन आलेल्या पैशातून व माझे साडू अमोल अर्जून काळे यांनी केलेल्या गृह कामाच्या रक्कमेतून विशाल फटे यांना आर.टी.जी.एस. ने दिलेले आहेत 9)रुपये 34,00,000/-  आर.टी.जी.एस. द्वारे माझे नातेवार्इक श्री सुभाष चंद्रकांत घोगरे रा. हडपसर पुणे यांनी माझ्या सांगण्यावरुन विशाल फटे यांच्या विशालका कन्सल्टन्सी सर्विसेस प्रा.लि. यांचे खात्यावर ता. 05/01/2022 रोजी व दि.06/11/2021 रोजी भरले होते. तसेच रोख रक्कम माझे मार्फतीने दिली होती. एकूण रुपये 96,25,000/- असे माझे मार्फतीने गुंतविले होते.ब) माझा भाऊ किरण बाबासाहेब अंबारे याने गुंतविलेली रक्कम रुपये 41,00,000/- दि. 03/12/2021 रोजी विशालका कन्सल्टन्सी सर्विसेस प्रा.लि. यांचे खातेवर आर.टी. जी.एस. मार्फत जमा केलेली होती.  रुपये 9,00,000/-  विशाल फटे यांचेकडे रोख रक्कम दिली. एकूण रुपये 50,00,000/- क ) माझा मित्र संग्राम दिलीप मोहिते रा. 725ड/21 शिवाजी नगर, बार्शी याने दि. 16/09/2021 ते  10/12/2021 पर्यंत वेळोवेळी चेकने अलका शेअर्स सर्विसेस व विशालका शेअर्स कन्सल्टन्स सर्विसेस प्रा.लि.मध्ये एकूण रक्कम रुपये 3,60,20,000/- अशी गुंतविलेली आहे. ड) माझा मित्र श्री रोहित सुर्यकांत व्हनकळस रा. अलिपूर रोड, व्हनकळस प्लट बार्शी याने रोख रक्कम  35,00,000/- रुपये जमा केली होती त्यावेळी सर्विस अग्रीमेंट बनविले होते. त्यावेळी 100 रुपये स्टम्प पेपर हा माझे हस्ते घेतलेला होता. त्यास  15,00,000/- व 20,00,000/ – रुपयांचा चेक  विशाल फटे याने रोहित यास दिला होता. इ) माझे ओळखीचे सुनिल सुरेश जानराव रा.उपळार्इ रोड, नार्इकवाडी प्लट बार्शी याचे 20,00,000/- रुपये विशाल फटे याचेकडे जमा केले होते. त्यावेळी सर्विस अर्गिमेंट बनविले होते. त्यावेळी 100 रुपये स्टम्प पेपर हा माझे हस्ते घेतलेला होता. त्यास 20,00,000/ – रुपयांचा चेक विशाल फटे याने दिला होता. ई) माझे ओळखीचे हणुमंत सुभाष ननवरे, रा. 1690 झाडबुके मैदान लहूजी चौक, बार्शी याचे 2,00,000/- रुपये विशाल फटे याचे अलका शेअर्स सर्विसेस या खात्यावर जमा केला होता. तो त्यांनी एस.बी.आय. बंकेमार्फत आर.टी.जी.एस.ने दिले होते.  विशाल फटे यास दि. 27/11/2021 रोजी झी हिंदुस्थान यांचे वतीने केंद्रीय मंत्री पियुष गोयल भारत सरकार यांचे हस्ते बेस्ट टेक्नलजी डेव्हलपमेंट इन अल्गो ट्रेडींग इन इंडिया म्हणून अवार्ड देण्यात आले होते. त्यामुळे ब-याच लोकांनी कोटयावधी रुपयांची रक्कम विशाल फटे यांनी तयार केलेल्या वरील कंपनीमध्ये विश्वासाने गुंतवणूक केली होती. तसेच जे.एम. फायनान्स सर्विसेस नावाची त्यांनी कंपनी तयार करुन त्याचे बनावट कागदपत्रे तयार करुन ते एच.डी.एफ.सी. पुणे या बंकेत त्या कंपनीचे अकाऊंट काढले. त्या अकाऊंटवर जे.एम. फायनान्स नावावर पैसे भरण्यास गुंतवणूकदारांना सांगितले होते. त्या अकाऊंटवरही गुंतवणूकदारांनी मोठया प्रमाणात गुंतवणूक केली होती. परंतू ती कंपनी बनावट असलेबाबत जे.एम. फायनान्स सर्विसेस या मुळ कंपनीच्या लक्षात आल्याने कंपनीने एच.डी. एफ.सी. बंकेतील अकाऊंट बंद करण्यास भाग पाडले होते. तसेच विशाल फटे याने त्याचे मोबाईलवरुन दि. 14/12/2021 रोजी वटसअप ग्रुपवर एक संदेश टाकला की, रुपये 10,00,000/- गुंतविल्यास वर्षभर न परतावा घेता वर्षाअखेरीस रुपये 6 कोटी देण्यात येतील. त्याकरीता मर्यादीत सभासद घेणार असल्याबाबतचा संदेश प्रसारित केला. एक पत्रक सुध्दा त्याने काढले होते. त्यामध्ये त्याने सदरची रक्कम ही रोख स्वरुपात स्विकारणार असल्याचे कळविले. त्यामध्ये किती लोकांनी सदर रक्कम भरली हे मला सांगता येणार नाही. अशा प्रकारची रक्कम त्याचेकडे खुप मोठया प्रमाणात जमा झाली होती. दि. 07/01/2022 रोजी मी सकाळी जिममध्ये असताना सुमारे 08:30 वाजण्याचे सुमारास विशाल फटे याने मला फोन करुन त्याचे उपळाई रोड येथील ऑफिसजवळ येण्यास सागितले. मी तेथे पोहचल्यानंतर तो तेथे आला व सांगितले की, त्याचे पुण्यातील मामा सावंत यास अटक आल्याने तो त्याची आई, वडील व पत्नी समवेत त्यांना पाहण्यास पुणे येथे जात आहे. त्याने मला जाताना विशालका कन्सल्टन्सी प्रा.लि. या अकाऊंटवर रक्कम रुपये 35,00,000/- येवढे ट्रान्सफर करण्यास सांगितले मी ती आर.टी.जी.एस.ने केली होती. त्यानंतर त्याने सांगितल्याप्रमाणे 2 आर.टी.जी.एस. मी आटपाडी येथे केले होते. दि. 09/01/2022 पासून त्याचा फोन आजपर्यंत बंद येऊ लागला, त्यावेळी माझी खात्री झाली की विशाल फटे हा आम्हा मित्रांना न सांगता त्याचे वरील वित्तीय कंपनीमध्ये गुंतविलेल्या मोठया रक्कमा घेऊन त्याचा परतावा किंवा फायदा न देता आमचा विश्वासघात करुन व ठकवणूक करुन निघून गेला आहे. याची खात्री झाल्याने आज रोजी माझी व माझे मित्रांची तसेच शेअर्स मध्ये पैसे गुंतवणूक केलेल्या इतर नागरिकांची फसवणूक केल्याने मी पोलीस ठाणेस येऊन त्याचे व त्याचे कंपनीमध्ये असलेल्या संचालकाविरुध्द तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणेस आलो आहे. तरी सन 2019 पासून आजपर्यंत विशाल अंबादास फटे रा. अलिपूर रोड, माऊली चौक, बार्शी याने विशालका कन्सल्टन्सी सर्विसेस प्रायवेट लिमिटेड, अलका शेअर्स सर्विसेस, जे.एम. फायनान्सीयल सर्विसेस या वित्तीय आस्थापना स्थापन करुन त्यामध्ये त्याचे वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे तसेच आई अलका फटे यांना संचालक करुन सदर आस्थापनेमध्ये गुंतवणूक करण्याकरिता आमिष दाखवून गुंतवणूक केलेली रक्कम वेगवेगळया कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणार आहे असे आश्वासन देऊन त्याचे कंपनीमध्ये विश्वासाने गुंतवणूक करण्याकरिता  1) मला रुपये 96,25,000/- 2) माझा भाऊ नामे किरण बाबासाहेब अंबारे यास रुपये 50,00,000/- 3) माझे मित्र संग्राम दिलीप मोहिते यास रुपये 3,60,20,000/- 4) रोहित सुर्यकांत व्हनकळस रा. अलिपूर रोड, व्हनकळस प्लट बार्शी यास रुपये  35,00,000/- 5) सुनिल सुरेश जानराव रा.उपळाई रोड, नाईकवाडी प्लट बार्शी यास रुपये 20,00,000/- 6) हणुमंत सुभाष ननवरे, रा. 1690 झाडबुके मैदान लहूजी चौक, बार्शी यास रुपये 2,00,000/- अशी एकूण रुपये 5,63,25,000/-  गुंतवणूक केली. तसेच अनेक गुंतवणूकदारांची विश्वासाने जी.एम.फायनान्स सर्विसेस हया कंपनीचे बनावट कागदपत्रं तयार करुन एच.डी.एफ.सी. बंकेत बनावट खाते तयार करुन त्यामध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक केल्यास मोठया प्रमाणात परताव्याचे अमिष दाखवून मोठया प्रमाणात गुंतवणूक करुन घेतली. तसेच त्याने त्याचे मोबाईलवरुन वटस्अप ग्रुपवर एक संदेश टाकून रुपये 10,00,000/- गुंतविल्यास वर्षभर परतावा न देता वर्षाअखेरीस रुपये 6 कोटी देण्यात येतील त्याकरीता मर्यादीत सभासद घेणार असल्याचे एक पत्रक काढून गुंतवणूकदारांना आकर्षित करुन गुंतवणूकदारांनी विश्वासाने मोठया प्रमाणात गुंतवणूक केलेली रक्कम, त्याचा परतावा देतो असे सांगूनही तो न देता मला व अन्य गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणूक  रक्कमेचा अपहार करुन, वरील नमूद वित्तीय आस्थापनाच्या संचालक 1) विशाल अंबादास फटे 2) राधिका विशाल फटे 3) अंबादास गणपती फटे 4) वैभव अंबादास फटे 5) अलका अंबादास फटे सर्व रा. अलिपूर रोड, माऊली चौक, बार्शीता बार्शी जि.सोलापुर यांनी संगणमताने ठकवणुक केली .

Advertisement

A case has been registered against five persons with huge tears at Barshi city police station

Leave a Reply