October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पांगरीत रस्ता रोको, मंत्री तानाजी सावंतांचे पंधरा दिवसांत अतिवृष्टीचे अनुदान देण्याचे अभिवचन…

आश्वासनाप्रमाणे पंधरा दिवसात वगळलेल्या सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई व अग्रीम पिकविमा न दिल्यास संबंधित मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन करणार… शंकर गायकवाड

Advertisement

पांगरी ;- महाराष्ट्र स्पीड न्युज
  अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिकविम्याची अग्रीम रक्कम मिळण्यासाठी शेतकरी संघटना व पंचक्रोशीतील शेतक-यांनी  बार्शी-लातूर महामार्गावरील  पांगरी येथील बस स्थानक चौकात शेतकरी रस्त्यावर उतरलेले होते. त्यावेळी धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांचा ताफा त्या मार्गावरून पुढे जाणार होते. परंतु आंदोलनामुळे हा ताफा अडकून पडला होता. त्यामुळे मंत्री तानाजी सावंत गाडीखाली उतरून आंदोलनामध्ये आले व त्या ठिकाणी पंधरा दिवसाच्या आत अतिवृष्टीतून वगळलेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल असे आश्वासन दिल्यानंतरच शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करून पंधरा दिवसाच्या आत मागण्यांची पूर्तता न झाल्यास संबंधित मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.

Pangrit Rasta Roko, Minister Tanaji Sawant's promise to provide heavy rainfall subsidy in fifteen days

त्यावेळी धनंजय तौर, सुहास देशमुख, सुनील गाढवे, सुरज पोकळे, भगवान खबाले, अनिल शिंदे, बाळासाहेब जगताप, बाबासाहेब जाधवर, डॉ.अरुण नारकर, रामभाऊ देशमुख, नानाप्पा मुंढे, सागर गोडसे, दादा गोडसे, बाबू काझी, गणेश काळे, किरण मुळे, शहाजहान बागवान, सौरभ यादव, बालाजी यादव, संतोष चव्हाण, बाबा जाधव, औदुंबर पाटील, शिवाजी गोडसे, सुनील खवले आदींसह हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
सुमारे एक तास हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन मंत्री तानाजी सावंत व बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने,सपोनी सुधीर तोरडमल, मंडल अधिकारी विशाल नलवडे, तलाठी श्रीकांत शेळके यांनी स्वीकारले.

Leave a Reply