December 3, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत दोघाना गावठी पिस्तूल सह अटक,तिन दिवसांची पोलीस कोठडी

बार्शी;-महाराष्ट्र स्पीड न्युज
  विनापरवाना दोन जिवंत काडतुसासह गावठी बनावटीचे पिस्टल,चाकु व दोन मोबाईल हॅण्डसेट अशा 65 हजार रूपयांच्या मुद्देमालासह उस्मानाबाद येथील दोघांना बार्शी पोलिसांनी धारदार घातक शस्त्रासह अटक केल्याचा प्रकार आज दि.13 मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास बार्शी बसस्थानकासमोरील प्रवेशद्वाराजवळ घडला.घातपाताच्या उद्देशाने फिरणा-या दोघांना अटक केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement



@सुजीत बापुराव मुंढे वय 23 वर्षे रा. तांबरी विभाग उस्मानाबाद ता.जि. उस्मानाबाद व मेघराज उर्फ संकेत सतिश बागल वय 21 वर्षे रा माणीक चौक उस्मानाबाद ता.जि. उस्मानाबाद अशी याप्रकरणात अटक करण्यात आलेल्याची नावे असुन दोघाना आज बार्शी न्यायालयात उभे केले असता 15 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

@पो.कर्मचारी अविनाश  पवार वय 31 वर्षे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.रात्रगस्तीदरम्यान पेट्रोलींग करत असताना पोलिसांना गोपणीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम बसस्थानक आवारात संशयास्पद स्थितीत फिरत असुन त्यापैकी एकाच्या कमरेला पिस्टल आहे.  सपोनि ज्ञानेश्वर उदार , सुपोफोअजित वरपे, देशमुख हे बस स्थानक प्रवेशद्वाराजवळ गेले असता तेथे दोन इसम संशयीत रित्या थांबलेले दिसले व  पळुन जाऊ लागले.तेव्हा पोलिसानी त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडले.  मुंढे याच्याजवळ 50,050/-रुची एक गावठी बनावटीचे पिस्टल ,मँगझीनमध्ये धातुचे दोन राऊंड मिळाले.बागल याच्याजवळ धारदार चाकु व मोबाईल मिळुन आला.


   पिस्टन बाळगण्याचा परवान्याबाबत चौकशी केली असता  उडवा उडवीची उत्तरे दिली.याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोफौ अजित वरपे हे करत आहेत.

Leave a Reply

disawar satta king