June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

राज्यातील पावसाबाबत मोठी बातमी,आगामी 48 तासात

मुंबई : राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे बहुतांश भागात पाणीच पाणी झाले आहे. काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात तर एवढा पाऊस झाला की गावं आणि शेतं पाण्याखाली गेली आहेत. तसेच शहरांमधील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. असे असले तरीही आता हवामान खात्याने आणखी एक इशारा दिला आहे.

आता मुसळधार पावसाचा हा धोका टळला नसून महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे असल्याचं हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे आता शेतकरी, मच्छिमारांनी काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या दक्षिण कोकण प्रदेशात अद्यापही कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे.

त्यामुळे पुढील 48 तासात महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्टयाची तीव्रता वाढेल. हा पट्टा पश्चिम-वायव्येकडे सरकत जाऊन तीव्र स्वरूपाचा होईल. त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, काही तासांत समुद्राची स्थिती खवळलेली राहिल. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असेही हवामान विभागाकडून सांगितले गेले आहे.

Leave a Reply