पु.ल.चे हे धम्माल किस्से वाचुन पोट दुखल्यास तुमची जबाबदारी
१) एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली.बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. “तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार”.
ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले.”तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?”
२) साहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु.ल. ना आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असतानाच पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ‘ काय पडलं हो?’ ‘नाटक दुसरं काय?’ पु.ल.
३) वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली,”हा मझा मित्र शरद तळवलकर””हो का? अरे व्वा!” पु.ल म्हणाले होते, “चांगला मनुष्य दिसतो! नव्हे,हा चांगलाच असणार!””हे कशावरून म्हणतोस तू?” वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं.”अरे, याच्या नावावरून कळतेय ते!” पु.ल. म्हणाले. याच्या नावातएकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही.म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!”
४) त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचेआणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले”बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो”.
५) माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखतवाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्नठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले ‘हिने तर वर्मावरचघाव घातला’ .
६) माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका.एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते.हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, “तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?”लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या.ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, “अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या ‘वर्मा’वर नको रे बोट ठेवुस!”