October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील कापशी (सा) येथे पावसामुळे दोन अज्ञात व्यक्ती गेली वाहुन .

बार्शी :
बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार धुवांधार पावसाने सर्वत्र दाना दान उडाली आहे अनेक गावांमध्ये ओढे नदी नाल्यांना पुराचे स्वरूप आलेले आहे . गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अगदी तळकोकणापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच  बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. तसेच बार्शी तालुक्यातील कापशी (सा) येथील पुलावरून एक अज्ञात व्यक्ती वाहन गेला होता त्याला बाहेर काढण्यात यश आले आहे तसे त्याची दोन चाकी गाडी वाहून गेली आहे.तसेच सावरगाव मधील एक अज्ञात व्यक्ती वाहुन गेला आहे त्याचा अजुन तपास लागले ला नाही. तरी प्रशासन तात्काळ दखल घ्यावी .

Advertisement

Two unidentified persons were swept away due to rain in Kapshi (sa) of Barshi taluka.

           शेतातील काढणीला आलेल्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पावसामुळं झालेल्या दुर्घटनांमध्ये काही जणांना जीव देखील गमावावा लागला आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी लोक वाहून देखील गेले असल्याच्या घटना घडल्या आहेत. तरी प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी .

Leave a Reply