March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये,कांदा प्रश्नावर शरद पवार यांनी घेतली बैठक

कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. तसंच कांद्याच्या दरात कायम चढ उतार होणं ही चिंतेची बाब असून कांदा आयात निर्यतीचे सर्व अधिकार केंद्राकडे असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. निर्यात बंद करणं आणि आयात सुरु करणं परस्परविरोधी निर्णय असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. शरद पवार नाशिक दौऱ्यावर असून आज त्यांच्या अध्यक्षतेखाली कांदा प्रश्नावर महत्तपूर्ण बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

शरद पवारांनी यावेळी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये असं सांगितलं. “राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये.

कारण त्यांना अधिकार नाही. धाडी घालण्याच्या सूचना राज्य सरकारकडून नाही. व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचा राज्य सरकारचा संबंध नाही. निर्यातबंदी, आयात या संदर्भातील निर्णय राष्ट्रीय पातळीवर होतात,” असं शरद पवार यांनी म्हटलं. आंतरराष्ट्रीय बाजारात नाशिकचा कांदा असतो असं यावेळी त्यांनी नमूद केलं.

व्यापाऱ्यांना काही त्रास होतोय हे मला मंजूर आहे. पण म्हणून इतरांना त्रास व्हावा ही त्यांची भावना निश्चितच नसेल. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार सुरू ठेवावेत, शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूंनी नुकसान होऊ देऊ नये, अशी आग्रहाची विनंती मी या बैठकीत व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींना केली.

Leave a Reply