आ. प्रणिती ताई शिंदे यांचा मोहोळ दौरा.
सोलापूर;-
भिमा नदी काठावरील शेतकऱ्यांची ज्या तीव्रतेन नुकसान झाले आहे त्याच तीव्रतेने त्यांचे पंचनामे करण्यात यावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार प्रणितीताई शिंदे यांनी शेतकरी कुटुंबाला दिले.
मोहोळ तालुक्यातील भीमा नदी काठावरील घोडेश्वर माचनुर अरबळी मीरी या गावात भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तोंडाला आलेली संपूर्ण पिके वाया गेले आहे तेवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या शेतातील माती ही पुराच्या पाण्याने वाहून गेली आहे त्यामुळे आमदार प्रणितीताई शिंदे यांनी या भागात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी दौरा केला यावेळी डाळिंब द्राक्ष बागांचे नुकसान झालेले त्यांना पहावयास मिळाले तसेच पूर्ण वाढ झालेल्या उसाच्या पिकात अद्यापर्यंत पाणी होते त्यामुळे उसाचे पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे पाहणी दरम्यान त्यांनी संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने फळबागांचे नुकसान झाले आहे त्याच्या नोंदी व्यवस्थितपणे घेण्यात याव्यात अशा सूचना दिल्या, पडलेले विजेचे पोल, बंद पडलेले डीपी खंडीत असलेला वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा अशा सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या,
पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे पिकासह घरातील सर्व वस्तू वाहून गेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे जवळ काही शिल्लक राहिलेले नाही त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोख रकमेच्या स्वरूपात तातडीने मदत मिळावी व अन्नधान्य पुरवठा करण्यात यावा अशा सूचना महसूल विभागाला आमदार शिंदे यांनी दिली आहे
मीरी अरबळी या गावातील मच्छीमारांच्या जाळ्याही वाहुन गेल्या आहेत त्यांना स्वतः मच्छीमारीसाठी लागणाऱ्या जाळ्या देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. आमदार प्रणितीताई शिंदे ज्यावेळेस पाण्यामुळे करपलेल्या उसाच्या फडात नुकसान झालेले बघायला गेल्यावर तिथे उपस्थित असलेल्या महिलांनी अक्षरशः हंबरडा फोडला व धायमोकलून रडून आपल्या व्यथा मांडल्या यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे यादेखील भाऊक झाल्या व त्यांचे डोळे देखील पाणावले
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष राजेश पवार, सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात, मोहोळ तालुका अध्यक्ष अशोक देशमुख, जिल्हा सरचिटणीस रफिक पाटील, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष संग्राम चव्हाण, सुलेमान तांबोळी ,तालुका युवक अध्यक्ष आरिफ पठाण, तालुका सरचिटणीस संतोष शिंदे, हरिभाऊ काकडे, बसवंत पुजारी, युवा उपाध्यक्ष महादेव सुरवसे, लक्ष्मण माने, बालाजी लोहकरे, बेगमपूरचे तलाठी गणेश साठे ग्रामसेवक हरी पवार व तसेच बेगमपूर, अरबळी,मिरी या गावातील सर्व ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.