पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार संपत्ती कार्ड योजनेची सुरूवात
नवी दिल्ली 10 ऑक्टोबर:
Advertisement
रविवारी सकाळी 11 वाजता या योजनेची सुरूवात होणार आहे. रविवारचा दिवस हा ग्रामीण भागातल्या जनतेसाठी ऐतिहासिक राहणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. कोट्यवधी भारतीयांसाठी ही योजना महत्त्वाची ठरेल असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलंय.
ग्रामीण भागातल्या नागरिकांन आपल्या संपत्तीचा उपयोग आर्थिक गोष्टींसाठी करता यावा यासाठी एक कार्ड दिलं जाणार आहे.
त्याचबरोबर त्याचा इतर योजनांसाठीही फायदा होणार आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात 1 लाख नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर संपत्ती कार्डची लिंक दिली जाणार असून ते कार्ड त्यांना डाऊनलोड करता येईल. नंतर प्रत्यक्ष त्यांना ते कार्ड दिलं जाणार आहे.