June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

श्रीपतपिंपरी ओढ्यावरूण सातजण गेले वाहुण,सुदैवाने सर्व सुखरूप

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज

श्रीपतपिंपरी ता.बार्शी येथील ओढा ओलांडणा-या दोन महिला एक वृद्धासह शाळेय विद्यार्थी अशा सात जणांचा जिव सुदैवाने वाचल्याचा प्रकार आज बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास बार्शी-श्रीपतपींपरी रस्त्यावरील ओढ्यावर घडला. सर्वाधिक बांधकाम विभागाच्या निष्क्रिय कारभाराचा फटका येथील ग्रामस्थांच्या जिवावर बेतला होता.मात्र दैव बलवत्तर म्हणून सातही लोकांचे जिव वाचले.आता तरी प्रशासन दखल घेऊन पुलाची उंची वाढवणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
@@प्रवीण भारत शिरसागर वय ३५ , पपू कुंभार वय ३०,दिलीप ताकभाते वय ६५, अनिता दिलीप ताकभाते  वय ४०,पोपट घाडगे वय ६५, अनुसया घाडगे वय ५५ व निखिल महादेव कुंभार वय 17 अशी या घटनेत सुदैवाने जीव वाचलेल्या सात जणांची नावे आहेत

Advertisement

Seven people were rescued from Sripatpimpri stream, luckily all are safe
  याबाबत अधिक प्राप्त माहिती अशी की  बार्शी शहर व तालुक्यात दैनंदिन परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घालत आहे सलग दोन दिवसापासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी सुरू असल्यामुळे तालुक्यातील नद्या नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत आज सायंकाळी सहा वाजता श्रीपतपिंपरी येथील रहिवासी शेतातमधुन व काही शालेय विद्यार्थी बार्शी येथुन श्रीपत पिंपरी येथील गावाजवळील तो ओढ्यावरील फुल ओलांडत असताना एकाचा तोल जाऊन एक जण तोल जाऊन पाण्यात पडला त्याला वाचवण्याचा प्रयत्नात  इतर सहा जनही पाय घसरून व तोल जाऊन खाली पडुण तेही पाण्याचा प्रवाह बरोबर पुलावरून वाहून गेले पुलावरून काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी एकमेकांना आधार देत व  प्रयत्न करून पाण्याबाहेर सुखरूप आले .

पूलाची उंची वाढवण्यात यावी  अशी मागणी ग्रामस्थांकडून केली असली तरी प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याचा ग्रामस्थांकडून आरोप केला जात आहे.

Leave a Reply