June 11, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यात टाॅवरच्या बॅट-या चोरीचे सत्र सुरूच

बार्शी ;
बार्शी शहर व तालुक्यात टाॅवरच्या बॅट-या चोरीचे सत्र सुरूच असुन बार्शी शहरातील स्टेशन रोड भागातील मुलगे मळा भागातील टाॅवरच्या 48 बॅट-या चोरीचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा बार्शी तालुक्यातील मांडेगाव येथील भारत  संचार निगमच्या टाॅवरच्या बॅट-या चोरून नेल्याचे समोर आले आहे.

Advertisement

Tower bat theft season continues in Barshi taluka


#सुजीत चौधरी वय 25 रा.शिराळे ता.बार्शी यांनी याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की मांडेगाव येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी भारत संचार निगमच्या मालकीच्या मोबाईल टाॅवरच्या 90 हजार रूपये किंमतीच्या तब्बल 24 बॅट-या लंपास केल्या.याबाबत अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply