June 11, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीच्या डाॅ.राहुल मांजरे यांच्या साईसंजीवनी हॉस्पिटल मध्ये ‘फ्रि फ्लॅप ओंको प्लास्टिक सर्जरी’ यशस्वी

‘फ्रि फ्लॅप ओंको प्लास्टिक सर्जरी’ने दिलं जगण्याचं बळ दिल्याची रूग्नांची प्रतिक्रिया

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

कॅन्सर झाला हे कळलं तेव्हा डोकं काम करणं बंद झालं. पण, त्यावर तोडगा काढत साईसंजीवनी हॉस्पिटल बार्शी येथील डॉ राहुल मांजरे यांनी  मला माझं जीवन पुन्हा मिळवून दिलं. खरंतर तोंडाचा कॅन्सर झाला हे कळाल्यावर मी पूर्णपणे कोलमडलो होतो. पण, डॉक्टरांनी फ्रि फ्लॅप ओंको सर्जरीनंतर विद्रूप झालेला माझा चेहरा पुन्हा आहे तसाच करुन दिला, एका अर्थाने मी गमावलेला आत्मविश्वास मिळवून दिल्याचं सांगत रुग्ण फिरोज राहणार लातूर  (47) यांनी ‘फ्रि फ्लॅप ओंको प्लास्टिक सर्जरी’चं महत्त्व विषद केलं.

Successful ‘Free Flap Onco Plastic Surgery’ at Sai Sanjeevani Hospital, Barshi

मनाने खचलो,रूग्नाची प्रतिक्रिया

मूळचे लातूर इथं राहणारे फिरोज  यांना पहिल्यांदा नोव्हेंबर २०१५ मध्ये तोंडाचा  कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं. कॅन्सर झाल्याचं कळलं, तेव्हा सर्वप्रथम कुटुंबियांचा विचार डोक्यात आला. आपल्यानंतर कुटुंबाचं काय होईल? या विचाराने ते खचले. दोनवेळा ऑपेरेशन आणि एकवेळा रेडिएशन होऊन देखील, तोंडाचा कॅन्सर पुन्हा झाला पण, शेवटी त्यांनी बार्शी येथील साईसंजीवनी हॉस्पिटल मध्ये उपचार घेण्याचा निर्णय घेतला.

चेहरा विद्रूप होण्याची भीती…..

तोंडाचा कॅन्सर , आधीच्या ऑपेरेशन मध्ये काढून टाकलेला भाग, विद्रूप चेहरा , खाण्यासाठी न उघडू शकणारे तोंड  ही खंत मनात होती. पण, डॉ राहुल मांजरे यांनी फिरोज यांना ‘फ्रि फ्लॅप ओंको प्लास्टिक सर्जरी’चा पर्याय सांगितला आणि शस्त्रक्रिया देखील यशस्वीरित्या पार पडली. तब्बल १० तासांची शस्त्रक्रिया केल्यानंतर फिरोज यांना नवा चेहरा मिळाला अर्थात पूर्वीसारखाच. शस्त्रक्रियेनंतर फिरोज  पुन्हा एकदा नीट खाऊ आणि बोलू शकतात.
__जेव्हा पहिलं ऑपरेशन झालं तेव्हा माझा चेहरा आधीसारखा दिसत नव्हता. पण, ‘फ्रि फ्लॅप ओंको प्लास्टिक सर्जरी’मुळे मला माझा हरवलेला आत्मविश्वास परत मिळाला. मला माहीत देखील नव्हतं की अशी सर्जरी केल्यामुळे मी पुन्हा आधी सारखा दिसू शकेन. खाऊ शकेन .पण, आता मी खूप आनंदी आहे.
-फिरोज , फ्रि फ्लॅप ओंको प्लास्टिक सर्जरी केलेला रुग्ण
बघूनही वाटणार नाही कॅन्सर होता म्हणून__

अशीच एक घटना नागरबाई राहणार कर्जत यांच्यासोबत घडली. तोंडाच्या आत एक सफेद डाग आहे आणि त्यामुळे खाण्यासाठी, पिण्यासाठी त्रास होत असल्याचं नागरबाई  यांना जाणवत होतं. पण, तो डाग नसून कॅन्सरची गाठ आहे हे कळल्यावर आम्ही थेट कर्जत वरून डॉक्टरांचे नाव ऐकून साईसंजीवनी हॉस्पिटल बार्शी येथे आलो. नुकतच नागरबाई  यांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं. शिवाय, त्या ऑपरेशन नंतर ‘फ्रि फ्लॅप ओंको प्लास्टिक सर्जरी’ देखील झाली. आता त्यांच्याकडे बघितलं तरी वाटणार नाही की कधी काळी त्यांना कॅन्सर झाला होता आणि त्यांचं ऑपरेशन झालं होतं.
__साईसंजीवनी हॉस्पिटल मध्ये  आले तेव्हाही डॉक्टरांनी नेमकं काय झालं ते सांगितलं नाही. फक्त सांगितलं एक छोटसं ऑपरेशन करावं लागणार आहे. मोठ्या शिताफीने मला झालेलाआजार आणि त्यासाठी झालेले मोठे ऑपेरेशन मला न कळू देता लीलया पार पाडले , मला कसलाच त्रास झाला नाही  आणि आता मी सर्व काही करु शकते. माझ्या या सर्जरीसाठी उजव्या हाताची कातडी माझ्या जबड्यासाठी वापरण्यात आली आहे.
– नागरबाई , फ्रि फ्लॅप ओंको प्लास्टिक सर्जरी केलेला रुग्ण__

सर्जन डाॅ. राहुल मांजरे सांगतात….

गेल्या महिन्यात बार्शीच नव्हे तर सोलापूर, उस्मानाबाद , लातूर , नगर मध्ये देखील या सर्जरी होत नसाव्यात अशा 2 सर्जरी केल्या.या सर्जरीला साधारण 9-10 तासांचा कालावधी लागतो व रूग्न पूर्ण भूलीखाली असतो. साधारण पुढचे 3 दिवस जोखमीचेच असतात. तसा ओटी आणि आयसीयू सेटअप लागतो .free flap surgery
या ओरल कॅन्सर साठी असतात.दोन्ही केस यशस्वी झाल्या
रिस्क घेतली.बार्शीत अशा सर्जरी करू शकलो याचा फार आनंद झाला.आणि तेही मुंबईच्या 30-40 टक्के खर्चात.

Leave a Reply