June 8, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील पानगाव शिवारात  48 लाखाचे वाळुचे साठे जप्त,वाळु साठे महसुल,पोलीस प्रशासनाला आजपर्यंत माहिती नव्हते का? चर्चेला उधाण, तालुक्यात आनखी साठे असल्याचीही होतेय चर्चा?

सोलापूर ; महाराष्ट्र स्पीड स्पीड

अवैधरित्या वाळु चोरुन आणुन करण्यात आलेल्या  वाळुसाठ्यावर बार्शीच्या महसुल विभागाने अचानक छापा टाकून तब्बल 687 ब्रास 48,09,000/-रुपये  किंमतीची वाळु जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणात पानगाव ता.बार्शी येथील तिघांविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंकुश बाबु भिसे, धनाजी कृष्णाजी मोरे व हनुमंत रामदास तिखांडे तिघेही रा.पानगाव ता.बार्शी  अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळु साठे जप्त करण्यात आल्यामुळे वाळु तस्करांचे धाबे दनानले आहेत. मात्र वाळुचा येवढा मोठा साठा असताना महसुल विभागाला आजपर्यंत याची कल्पना नव्हती का? याबाबत चर्चिले जात आहे.

Advertisement

48 lakh sand stocks confiscated in Pangaon area of Barshi taluka, sand stocks revenue, was the police administration not aware till today? There is talk that there are more reserves in the taluka


  तहसिलदार सुनिल शेरखाने ,मंडलाधिकारी शरद शिंदे व तलाठी सचिन गोडगे यांनी ही कारवाई केली.

पानगावचे गाव कामगार तलाठी सचिन  गोडगे, वय 37 वर्षे, रा. गोंदिल प्लाॅट, उपळाई रोड, बार्शी  यांनी फिर्याद दिली आहे.महसुल विभागाला बातमीदाराकडुण बातमी मिळाली की, पानगाव येथील विविध ठिकाणी  अवैध वाळुचे साठे करुन ठेवलेलेले आहेत.त्यानुसार महसुलचे पथक पानगाव शिवारातील जमीन गट नं. 192 मध्ये गेले असता सदर जमीन गट नं 192 मध्ये एकुण 560 ब्रास अवैध वाळु साठा एकुण अंदाजे 39,20,000/-रु किंमतीचा मिळुन आला. चौकशी अंती सदरचा वाळुसाठा हा पानगाव येथीलच अंकुश  भिसे यांचा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथक तेथुन जमीन गट नं. 141 मध्ये गेले असता सदर जमीन गट नंमध्ये एकुण 70 ब्रास अवैध वाळु साठा एकुण अंदाजे 4,90,000/-रु किंमत मिळुन आला. सदरचा वाळु साठा धनाजी  मोरे रा. पानगाव यांचा असल्याचे समजले.


तेथुन पथक गायरान जमीन गट नं. 138 मध्ये गेले असता सदर जमीन गट नं मध्ये अंकुश भिसे यांचे घरालगत व भिसे यांच्या मालकीचा एकुण 22 ब्रास अवैध वाळु साठा एकुण अंदाजे 1,54,000/-रु किंमत मिळुन आला.
त्यानंतर गायरान जमीन गट नं. 138/1/ब मध्ये गेले असता सदर जमीन गट नंमध्ये हनुमंत तिखांडे रा.पानगाव  यांनी केलेला एकुण 35 ब्रास अवैध वाळु साठा एकुण अंदाजे 2,45,000/-रु किंमत मिळुन आला.जप्त करण्यात आलेले 687 ब्रास वाळुचे साठे पोलीस पाटील शंकर भोसले यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

वेगवेगळ्या गटात एकुण 687 ब्रास  48,09,000/-रु किंमतीची वाळु अवैधरित्या वाळु चोरुन आणुन वाळुसाठा करुन वाळु उत्खनन करुन पर्यावरणाचा -हास केल्याचे समोर आले आहे .तिघांविरुद्ध भारतीय पर्यावरण संरक्षण कायदा कलमान्वये बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply