June 8, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील घोळवेवाडीत तिघांकडून दोघांना मारहाण

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

पावसाचे पाणी घरासमोर साठण्याच्या किरकोळ कारणावरून तिघांनी मिळून पती पत्नीला काठी व दगडाने बेदम मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील घोळवेवाडी येथे घडला.

Two beaten by three in Gholvewadi in Barshi taluka

बापुराव भागवत घोऴवे, आशाबाई घोळवे व मुलगी अर्चना महादेव घुगे  अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

सायसराव दशरथ घोऴवे, वय 45 वर्षे,रा घोऴवेवाडी, ता बार्शी यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की 4 जुन रोजी सायंकाळच्या सुमारास मी घरासमोर असताना चुलत चुलते बापुराव घोऴवे हे माझे घरासमोर आल्याने व त्यांचे सोबत त्यांची पत्नी आशाबाई व मुलगी अर्चना महादेव घुगे ह्या पण आल्या त्यांनी तुमच्या घरातुन पावसाचे पाणी आमच्या घराजवळ येवुन साचते म्हणुन मनात राग धरून बापुराव याने मला काटीने डावे पायावर,नगडीवर माराहण करून दुखापत केली व त्यांचे सोबत असणारी त्यांची पत्नी आशाबाई व त्यांची मुलगी अर्चना हिने दगडाने मला मारहाण केली व बायको गंगाबाई हि सोडवा सोडव करण्यास आली असता तिला ही बापुराव याने काठीने हातावर करंगऴीवर माराहण केली त्या तिघांनी मिऴुण घरावर दगडे फेकुन मारली व आम्हाला तुमचा काटा काढतो तुम्हाला सोडत नाही म्हणुन अर्वाच्छ भाषेत शिवीगाऴी दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या मारहाणी मुळे माझ्या पुर्वी आपघात झालेल्या डाव्या पायास काठीने मार लागुन दुखापत झाली असुन त्या पायाचा राँड सटकला आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.त्यांच्यावर बार्शी येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पांगरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

disawar satta king