June 11, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कांदे अपहरण प्रकरण, अपहरणकर्ते अद्याप फरारच, तपास संथगतीने होत असल्याची चर्चा

बार्शी ;
बार्शी तालुक्यातील खांडवी येथील पम्चर दुकानावरून जबरदस्तीने अपहरण करून मारहाण करत टेंभुर्णीत सोडण्यात आलेल्या अपहरण प्रकरणातील संशयीत आरोपी सोळा दिवसांनंतरही फरारच आहेत.त्याच्यामुळे या प्रकरणाचा तपास संथगतीने सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.

Advertisement

Onion abduction case, the kidnappers are still absconding, the investigation is slow

याबाबत अधिक माहिती अशी की पैशाच्या कारणावरून विशाल कांदे रा.बोरगाव ता.बार्शी या टिपर चालकास  तिघांनी  मिळून जबरदस्तीने फाॅरच्युनर गाडीत बसवुन पळवुन घेऊन जाऊन लोखंडी टाॅमीने मारहाण करून टेंभुर्णी ता.माढा येथील चौकात मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास सोडल्याचा प्रकार बार्शी -कुर्डुवाडी रस्त्यावरील खांडवी येथील एका पंक्चर काढण्याच्या दुकानासमोर 26 मे रोजी रात्री घडला होता. या प्रकरणाला तब्बल 16 दिवसांचा कालावधी उलटून जाऊनही पोलिसांच्या हाती अद्याप कांहीच लागले नाही त्यामुळे तर्क वितर्क लढवले जात आहेत.

#आण्णासाहेब काजळे रा.बार्शी व अनोळखी दोन अशा तिघांविरुद्ध बार्शी तालुका पोलिस ठाण्यात याबाबत अपहरण करूण मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अपहरण कर्त्यांचा शोध घेण्यासाठी हालचाली करणे आवश्यक होते.घटनेला तब्बल सोळा दिवसांचा कालावधी उलटून जाऊनही अपहरण कर्ते अद्याप पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
@फिर्यादी  कांदे हे खांडवीतील दुकानासमोर टिपरचे टायर बदलण्यासाठी थांबले होते.तेव्हा आण्णासाहेब काजळे हे तेथुन जात असताना कांदे यांचा टिपर बघुन थांबले व कांदे यास माझे पैसै दे असे म्हणत शिविगाळ करत तिघांनी जबरदस्तीने कांदे यांना एम एच 44 आर 1212 या फाॅरच्युनर मध्ये बसवुन अपहरण केलेले होते.त्यानंतर माढा शहराकडे घेऊन जाताना वडशिंगे गावाजवळील वस्तीजवळ गाडीतून खाली उतरवुन लोखंडी टाॅमीने दोन्ही नडगीवर मारहाण करूण जखमी केले होते.त्यानंतर कांदे यांना त्याच गाडीत बसवुन माढा येथे नेले.तेथुन शेटफळ मार्गे टेंभुर्णी येथील चौकात आणुन मध्यरात्री दिड वाजता सोडुन दिले होते व अपहरणकर्ते फाॅरच्युनर गाडीतून तसेच पुढे मुंबईच्या दिशेने निघुन गेले होते.

Leave a Reply