June 11, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील कासारवाडीत बालकांची आरोग्य तपासणी

बार्शी;

माझे विध्यार्थी,माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कासारवाडी ता.बार्शी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ०ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Health check-up of children at Kasarwadi in Barshi taluka


        यावेळी अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा या ठिकाणी शिकणारी बालके यांची आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैदयकीय अधिकारी कुलकर्णी व आरोग्य सेविका मुंढे व त्यांच्या सर्व पथकाने केली.
    यावेळी पंचायत समिती बार्शी गटशिक्षणाधिकारी साधना काकडे यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजिंक्य कदम होते.
     सदर बाल आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी चे मुख्याध्यापक सुधाकर बडे, राजीव कांदे, शशिकांत बसनगौडर, द्वारका पिंपळे, अंगणवाडी सेविका श्रीमती गुंड, मनीषा सिद्धगणेश यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

Maharashtra Speed News,Maharashtra, SPEED news,Maharashtra  update, 

Maharashtra news,Maharashtra live update,Maharashtra corona,solapur  news,soplapur,solapur corona update,solapur update,Live news,Live update,latest  update,Mumbai,pune,Osmanabad,                  

Leave a Reply