December 8, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शिक्षणातून सामाजिक व्यक्तिमत्त्व विकसन गरजेचे – प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे

बार्शी;
बार्शीतील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात दिनांक ०८ ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत समाजसेवा प्रात्यक्षिक अंतर्गत ऑनलाईन व्याख्यान व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे हे होते. माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

The need for social personality development through education – Principal Dr. Sugreev Gore

या कार्यक्रमांतर्गत प्रा. डॉ. ए बी कदम यांचे अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार याविषयी सखोल माहिती दिली. निरीक्षण, तर्क, अनुमान , प्रचिती व प्रयोग या संकल्पना स्पष्ट केल्या. वैज्ञानिक दृष्टीकोन सत्याच्या सातत्यावर उभा असतो. जीवनाचा मूल्य आशय शिकवितो. सम्यकता, स्वायत्तता, निर्भयता, शोधकता व नम्रता या गुणांचा विकास होणे गरजेचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी आवाहन केले.

स्नेहग्रामच्या संचालिका सौ. विनया निंबाळकर यांनी स्नेहग्राम एक सामाजिक संस्था या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी समाजातील वंचित घटकाच्या सुधारणेसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. समाजातील वंचित व गरजू विद्यार्थ्यांना स्नेहग्रामच्या माध्यमातून एकत्र आणले.स्नेहग्रामच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांची जडणघडण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांवर लोकशाहीयुक्त वातावरणाचे संस्कार केले जातात. मूल्ये, शिस्त व संस्कार विकसनावर भर दिला जातो असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस एस गोरे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजसेवा, स्नेहग्राम सामाजिक संस्था या विषयावर  मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन  स्नेहल गुरव व अल्पना पिंपळे यांनी केले. आभार सोमनाथ लोंढे व निलिमा पाटील यांनी मानले. प्रास्ताविक अश्रुबा वाघमारे व वैभव घुगे यांनी केले. प्राचार्य डॉ. एस एस गोरे, समन्वयक प्रा. डॉ. एस डी भिलेगावकर, सह समन्वयक डॉ. महादेव मते यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply