December 8, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

दुखापत करुन जबरी चोरी करणा-यास तालुका पोलिसांनी केले जेरबंद ; गुन्हयातील 40 हजाराचा  सोन्याचा मुद्देमाल हस्तगत

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
दुखापत करुन जबरी चोरी करणा-यांना जेरबंद करूण त्यांच्याकडून गुन्हयातील चाळीस हजार रूपये किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केल्याची कामगीरी बार्शी तालुका पोलीसांनी केली.

Advertisement


  याबाबत अधिक माहिती अशी की
बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. 30/7/2021 रोजी रात्री 8:30 वा.चे सुमारास पती, पत्नी व मुलगी असे मोटार सायकलवरुन जात असताना ताडसौंदणे गावाचे पुढे  4 अनोळखी आरोपीनी त्यांना मारहाण करुन चाकुचा धाक दाखवुन त्यांचे जवळील सोन्याचे
दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने घेवुन गेले होते.याबाबत  बार्शी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वाढत्या चोरीच्या घटनामुळे पोलीस
अधीक्षकांनी  गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने  सपोनि शिवाजी जायपत्रे यांनी पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, पोहेकॉ/ सुभाष सुरवसे, पोहेकॉ/राजेंद्र मंगरुळे, अमोल माने,धनराज केकाण यांचे विशेष पथक नेमले होते. सपोनी
जायपत्रे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीद्वारे आरोपी निष्पण्ण करुन आरोपी नामे प्रशांत ऊर्फ सचिन
बापु काळे ऊर्फ पवार वय 23 वर्षे रा.तेरखेडा ता.वाशी जिल्हा – उस्मानाबाद याच्यावर लक्ष ठेवनु , सदर
आरोपी हा तेरखेडा गावातील चौकात येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळवली होती.
   आरोपी प्रशांत
ऊर्फसचिन बापु काळे ऊर्फ पवार यास ताब्यात घेवुन  पोलीस ठाण्यात आणुन त्यास विश्वासात घेवुन तपास केला असता त्यांचे इतर तीन साथीदाराच्या मदतीने अडवुन चोरी केल्याच्या गुन्ह्यासह भुम पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरी असे दोन  गुन्हे उघडकीस आणले.

Taluka police arrests burglar after injuring him; 40,000 worth of gold seized in crime

सोन्याच्या मणी मंगळसुत्रासह दोन कर्णफुले असा एकुण 40,000/-रु चा व गुन्हयात वापरलेली 15 हजाराची मोटार सायकल असा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

disawar satta king