September 21, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

अतिवृष्टीच्या अनुदानासाठी रविवारी पांगरीत रस्ता रोकोचे आयोजन

पांगरी;- महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी तालुक्यातील पांगरीसह आठ मंडळे अतिवृष्टीतुन वगळल्याच्या निषेधार्थ येत्या रविवारी दि. 25 रोजी सकाळी
बार्शी-लातूर  या राष्ट्रीय मार्गावरील पांगरी येथे  वंचित मंडलातील शेतकऱी व शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन  करण्यात  आले आहे.पांगरी पोलिस ठाण्याचे सपोनी सुधीर तोरडमल यांना या आंदोलनाबाबत निवेदन देण्यात आले.

Advertisement

Organized Pangrit Road Roko on Sunday for heavy rain subsidy


  यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर गायकवाड,जामगावचे सरपंच बाळासाहेब जगताप,सोसायटीचे चेअरमन रामभाऊ देशमुख,साहेबराव पवार, धनंजय तौर,बाबा जाधव,संतोष चव्हाण, भगवान खबाले,बाबु काझी,बालाजी काळे आदी शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply