June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार संपत्ती कार्ड योजनेची सुरूवात

नवी दिल्ली 10 ऑक्टोबर:

Advertisement
 पंतप्रधान नरेन्द्र मोदी (PM Narendra Modi) रविवारी (11 ऑक्टोबर) ‘स्वामित्व’ योजना (SVAMITVA Scheme) ची सुरुवात करणार आहेत. या योजनेत नागरिकांना त्यांच्या संपत्तीच्या मालकीचं कार्ड दिलं जाणार आहे. त्यामुळे बँकेतून कर्ज घेणं किंवा इतर कामांसाठी त्या कार्डचा उपयोग केला जाऊ शकतो.

रविवारी सकाळी 11 वाजता या योजनेची सुरूवात होणार आहे. रविवारचा दिवस हा ग्रामीण भागातल्या जनतेसाठी ऐतिहासिक राहणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. कोट्यवधी भारतीयांसाठी ही योजना महत्त्वाची ठरेल असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलंय.

ग्रामीण भागातल्या नागरिकांन आपल्या संपत्तीचा उपयोग आर्थिक गोष्टींसाठी करता यावा यासाठी एक कार्ड दिलं जाणार आहे.

त्याचबरोबर त्याचा इतर योजनांसाठीही फायदा होणार आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात 1 लाख नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर संपत्ती कार्डची लिंक दिली जाणार असून ते कार्ड त्यांना डाऊनलोड करता येईल. नंतर प्रत्यक्ष त्यांना ते कार्ड दिलं जाणार आहे.

Leave a Reply

disawar satta king