October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

अजित पवार म्हणाले… शाळा सुरू होणारच,पण

दिवाळीपर्यंत शाळा सुरू होऊ शकत नाही. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा आढावा घेण्यात येईल,

दिवाळीआधी शाळा सुरू होणार नाहीत, असे अजित पवार यांनी सांगितले.

ते ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात बोलत होते.

ते म्हणालेत – ‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार’ या मोहिमेला पुणेकरांनी साथ द्यावी.

अजित पवारांच्या हस्ते पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटप करण्यात आले.

शाळा सुरु करण्याबाबत दिवाळीनंतर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ.

दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा आढावा घेण्यात येईल, दिवाळीआधी शाळा सुरू होणार नाहीत, असे ते म्हणाले.

अजित पवार यांनी सांगितलं की, आपण कोरोना महामारीच्या संकटातून आपण जात आहोत.

मध्यंतरी ‘सोशल डिस्टंसिंग’कडे दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम पुणेकरांनी भोगला आहे.

सुरुवातीला लोक कोरोना झाल्याचे सांगायला घाबरायचे. आता परिस्थिती बदलते आहे.

पुण्यात डिसेंबर, जानेवारीत दुसरी लाट येऊ शकते, हा अंदाज खोटा ठरवण्यासाठी जबाबदारीने वागा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

Leave a Reply

disawar satta king