नवरात्री विशेष;जावुन घ्या कोणत्या दिवशी कोणता रंग
मुंबई : गणेशोत्सव संपताच काही दिवसांतच नवरात्रीची लगबग सुरु होते. दसरा, नवरात्री हे सण तरुणाई व महिलांसाठी खास असतात. यंदा शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होणार आहे. १७ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या काळात नऊ दिवस ठिकठिकाणी आदिशक्तीचा जागर असतो. मागील काही वर्षांपासून नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू झाली.
एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी या मागील धारणा आहे. एकोपा आणि समानतेचा संदेश यातून दिला जातो. जाणून घेऊया यंदाच्या नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग आहे ते :
नवरात्रीचे नऊ रंग (२०२०)
१७ ऑक्टोबर – प्रतिपदा – राखाडी (Grey)
१८ ऑक्टोबर – द्वितिया – केशरी/नारंगी (Orange)
१९ ऑक्टोबर – तृतिया – पांढरा (White)
२० ऑक्टोबर – चतुर्थी – लाल (Red)
२१ ऑक्टोबर – पंचमी – निळा (Royal Blue)
२२ ऑक्टोबर – षष्ठी – पिवळा (Yellow )
२३ ऑक्टोबर सप्तमी- हिरवा (Green)
२४ ऑक्टोबर – अष्टमी – मोरपंखी (Peacock Green)
२५ ऑक्टोबर – नवमी – जांभळा (Purple)