June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शेतकऱ्यांनो ऐकलं का ! सोयाबीनच्या भावात तेजीची शक्यता!

🎯 यावर्षी अतिवृष्टी होऊन भरपूर पिकांचे नुकसान झाले. त्याला सोयाबीही अपवाद नाही. मागणीच्या मानाने प्रचंड कमी उत्पादन झाल्याने बऱ्याच दिवसांपासून सोयाबीनच्या दरात तेजीची परिस्थिती बघायला मिळत आहे.

💁‍♂️ शासनाने जाहीर केलेल्या हमी भावानुसार ३८८० रुपये दर आपल्याला मिळेल. परंतु आता बाजारात ४ हजार ते साडेचार हजार रुपयांच्या भावापर्यंत सोयाबीन खरेदी केले जात आहे.

🌏 जगाचा विचार केला तर ब्राझील, अमेरिका इत्यादी देशांमध्ये सुद्धा शेतमालाचे उत्पादन प्रचंड घातल्याने सोयाबीनचे दरात आणखी उच्चांकी वाढ पाहायला मिळू शकते.

📌 ४ हजार ७०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तविण्यात येत आहे.

💁‍♀️ महाराष्ट्राच्या आजूबाजूचा राज्यांमधून विशेषतः मध्यप्रदेश मधून सोयाबीनच्या चांगल्या प्रकारच्या आवक महाराष्ट्रात होते. परंतु मध्य प्रदेशमध्येही झालेल्या अतिपावसामुळे तिथल्या सोयाबीन पिकावर मोठा परिणाम झाला.

👉 त्यामुळे मागणीच्या प्रमाणात पुरवठा फारच कमी असल्याने काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात मोठी वाढ दिसून आली आहे.

📍 आता पाऊस थांबल्याने बऱ्यापैकी सोयाबीनची आवक मार्केटमध्ये दिसून येत आहे.

💁‍♀️ त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शेतमालाच्या दरात २०० रुपयांपर्यंत घट येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

💁‍♂️ परंतु अशा प्रकारची स्थिती जास्त दिवस टिकणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सुद्धा सोयाबीनची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने सोयाबीनच्या दरात पुढे वाढवण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

disawar satta king