December 3, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

रस्ते दुरूस्ती, उस्मानाबाद-कळंब मतदार संघासाठी 30 कोटी 60 लाख मंजुर ;कैलास पाटील

उस्मानाबाद;
उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातील रस्त्यांच्या दूरुस्ती कामासाठी 30 कोटी 60 लाख रुपये निधी मंजुर..

Advertisement

यामध्ये प्रामुख्याने उस्मानाबाद शहरातील जिजाऊ चौक ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, बार्शी वळण रस्त्यामध्ये काँक्रिट गटार बांधकाम करण्यासाठी चार कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली आहे.

धाराशिव(उस्मानाबाद) तालुक्यातील भिकार सारोळा-आरणी ते खामगाव रस्त्यासाठी दिड कोटी मंजुर करण्यात आले आहेत.

पिंप्री गोडाऊन ते राघुचीवाडी रस्त्यासाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

बावी ते धारुर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

खेड ते खेडपाटी रस्त्याची सुधारणा करणे 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

कावळेवाडी गावाजवळ पुलाचे बांधकाम करण्यासाठी एक कोटी 80 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

कळंब शहरातील कळंब-ढोकी रस्त्याची काँक्रिट रस्त्यासह सुधारणा करण्यासाठी चार कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत.

कळंब तालुक्यातील मस्सा-मोहा-गोविंदपुर रस्त्यासाठी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

राज्य मार्ग ते देवधानोरा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

कळंब-मोहा-येडशी रस्त्याची सुधारणा करणे एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

मंगरुळ गावातील काँक्रिट रस्ता व नाली बांधणे यासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

ईटकुर-हासेगाव रस्त्याची सुधारणा करणेकरीता तीन कोटी 60 लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत.

मस्सा ते मोहा रस्ता, मोहा गावाजवळील पूल बांधणे आदी कामासाठी एक कोटी 17 लाखाचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

येरमाळा येथे नवीन शासकीय विश्रामगृह बांधकामासाठी दोन कोटी 63 लाख रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

या सर्व कामासाठी निधीची तरतुद करण्यात आल्याने लवकरच ही कामे पूर्णत्वास जातील व या भागातील दळणवळण आणखी सोपे होईल याची खात्री आहे.

मतदारसंघातील ग्रामीण तसेच शहरातील पायाभूत सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी मागणी केलेल्या कामांना अर्थसंकल्प २०२१ मध्ये तात्काळ मंजुरी देऊन निधीची तरतूद केल्याबद्द्ल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना.अजित दादा पवार साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकरावजी चव्हाण साहेब, युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री ना.आदित्यजी ठाकरे साहेब, उपनेते मा.मंत्री आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब, पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख-पाटील साहेब, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांचे  आभार व्यक्त केले.

Leave a Reply