December 1, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याचा निषेधार्थ ढोकीत गांधीगिरी पद्धतीने “भव्य रक्तदान शिबीराचे” आयोजन


महाराष्ट्र स्पिड न्युज
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन ढोकी व पंचक्रोशीतील सकल बांधव यानी रक्तदान केले.मराठा क्रांती युवा संघ ढोकी यांच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे.व सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला दिलेल्या स्थगितीला आव्हान राज्य सरकारने देऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे .म्हणून कोणतीही तोड फोड ,जाळ पोळ न करता कोरोनाच्या काळात मदतीचा हात म्हणून मराठा क्रांती युवा संघ ढोकी आयोजकांनी सकल बांधव यांच्या वतीने राक्तदान शिबिराचे आयोजन केले.यामध्ये हिन्दु – मुस्लीम बांधव यानी राक्त्दान केले .राक्त्दाता बांधव याना महाराष्ट्र पैलवान संघटना उस्मानाबाद तालुकाध्यक्ष पै.सतिश वाकुरे यांच्या वतीने स्टीमर मशीनचे वाटप करण्यात आले.तसेच सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर, जय जिजाऊ ,जय शिवराय ,जय संभाजी महाराज- समस्त मराठा क्रांती संघ ढोकी पंचक्रोशी
यांच्या वतीने राक्त्दाता बांधव याना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.अल्पोपहाराचे आयोजन बंटी वाकुरे यानी केले.तसेच ढोकी पोलीस ठाण्याचे सपोनी सुरेश बनसोडे  यानी पार्ले बिस्किट पुडे देऊन उपक्रमाची प्रशंसा केली.
  यावेळी उस्मानाबाद पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख,ढोकी गावचे उपसरपंच अमोल समुद्रे ,प्रा.सुशील शेळके ,जिल्हा परिषद समाज कल्याण  सभापती दगडू धावारे,गुणवंत देशमुख,जय निंबाळकर ,पोलीस पाटील राहूल वाकुरे,महाराष्ट्र कुणबी संघटना अध्यक्ष अॅड.तुकाराम शिंदे ,बणी थोडसरे ,नवनाथ शिंदे,अशोक काळे ,अनंत शिंदे ,भाऊसाहेब गरड ,अमर देशमुख,दिपक देशमुख,सिराजमुल्ला पटेल ,संजय जाधव ,काशिनाथ काळे ,सुभाष गाढवे ,अस्लमभाई पठाण,जकी काझी ,दत्ता वाकुरे,गोविंद कुंभार,रामेश्वर पवार ,अॅड.महादेव शिंदे,व मराठा क्रांती संघाचे युवा आयोजक उपस्थित होते.

या वेळी प्रा. सुशील शेळके यांनी आरक्षणामधे केंद्र सरकारची आंध्र प्रदेश व तमीळनाडूच्या तुलनेत महाराष्ट्रासाठी जाणूनबुजून दुजाभावाची वागणूक यावर हल्ला चढवला व आरक्षणाची  पुढील दिशा या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अंकुश जाधव यानी केले.मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळेल हा आशावाद या कार्यक्रमा द्वारे केला जात आहे.या अनोख्या पद्धतीने आरक्षण मिळावे म्हणून केलेला निषेध ईतिहासात  नोंद करण्या सारखा आहे.

Leave a Reply