बालाजी अमाईन्स कडून जगदाळे मामा हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन मशीन भेट
बार्शी:-महाराष्ट्र स्पीड न्युज
सोलापूर येथील बालाजी अमाईन्स लि. कंपनी कडून बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल साठी दोन हाय फ्लो ऑक्सिजन मशीन भेट देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बी वाय यादव होते. यावेळी आमदार राजेंद्र राऊत,नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी,उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, बालाजी अमाईन्सचे सहायक तांत्रिक सल्लागार दत्तप्रसाद सांजेकर,
संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी पी टी पाटील, खजिनदार दिलीप रेवडकर, सांस्कृतिक प्रमुख जयकुमार शितोळे,डॉ चंद्रकांत मोरे, डॉ बोराडे, डॉ आर व्ही जगताप उपस्थित होते. यावेळी राजेंद्र राऊत यांनी सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात बालाजी अमाईन्सने सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या मदतीविषयी डी राम रेड्डी, त्यांचे सर्व संचालक, म आ बिराजदार, दत्तप्रसाद सांजेकर या सर्वाचे कौतुक केले व समाजातील सर्वांनी या हॉस्पिटलसाठी उत्स्फूर्तपणे आर्थिक मदत करावी असे आवाहन केले.प्रास्ताविक मेडिकल सुप्रीटेंडेंट डॉ आर व्ही जगताप यांनी केले.
यावेळी प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी पुढील काही महिने सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन करून बालाजी उद्योग समूहाविषयी कृतज्ञता व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ बी वाय यादव यांनी सध्याच्या कोविड आजारात ऑक्सिजन मशीन ही अत्यंत उपयुक्त मदत अतिशय वेळेवर मिळाल्याबद्दल संस्थेतर्फे कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी दत्तप्रसाद सांजेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा किरण गाढवे यांनी व आभार जयकुमार शितोळे यांनी व्यक्त करून सदर भेट स्तुत्य व अभिनंदनीय आहे असे नमूद केले.