गुळपोळीत विजेसाठी रस्ता रोको आंदोलन, आंदोलनानंतर शेतीपंपाचा विज पुरवठा झाला पूर्ववत..
सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
गुळपोळी ता.बार्शी येथे विज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात व विज पुरवठा पूर्ववत करावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी 9 वाजता सुरू झालेले आंदोलन तब्बल तीन तास सुरू होते.त्यामुळे वाहतूक ठप्प होती. जो पर्यंत शेतीपंपाचे कनेक्शन चालू करत नाहीत तो पर्यंत रास्ता रोको चालूच ठेवणार असे द्राक्षे बागायतदार शेतकरी व शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे यांनी ठणकाऊन सांगीतले व जो पर्यंत विज वितरण कार्यालयाचे उप अभियंता येऊन लेखी पत्र देत नाहीत तो पर्यंत चालू रास्ता रोको आंदोलन चालूच ठेवणार असा ठाम निर्णय घेतल्याने उप अभियंता उके यांनी समक्ष आंदोलन स्थळी येउन आज पासून शेतीपंपाचा विज पुरवठा वेळेनुसार सुरू करण्यात येईल व दुपारी 2 ते 3 या वेळेत जनावराना पिण्यासाठी एक तास शेतीपंपाचा विज पुरवठा सुरू केला. शेतकरी आणी विज वितरण यांच्यात तोडगा काढून बिल भरणयास सुरूवात केली आहे.
सदरचे आंदोलन यशस्वी करणयासाठी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे ,अमोल नरखडे अरीफ शेख, रेखा चिकणे, विलास सावंत, दत्ता चिकणे, मनोज मस्के, सुरज पवार हणूमंत पाटील, हणूमंत चिकणे, राहुल मचाले भानूदास चिकणे काका पाटील, कृष्णा चिकणे, ज्ञानदेव गोरे, शिवाजी चिकणे, अतुल चिकणे, सुनिल सावंत, सुनिल तुपसमिंदरे उपस्थित होते.
सुर्डीचे उप अभियंता उके यांनी लेखी पत्र दिल्यानंतर आदोलन स्थगित करण्यात.