February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कोरोना ; बार्शी उपविभागात साडेसात लाखाचा दंड वसुल

 बार्शी ;

सध्या संपूर्ण भारतात व महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावझपाट्याने वाढत असल्यामुळे तो वाढु नये यासाठी राज्य शासनाने नो मास्क केसेस, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व सोशल डिस्टंसिंग पाळणे बाबत बंधने घालुन दिलेली आहेत. तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्याला कायमस्वरूपी मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

Advertisement

या आदेशानुसार जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांचे आदेशावरून बार्शीचे पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांनी वेगवेगळ्या भागात पथके नेमुन व स्वतः या कारवाईत सहभाग घेऊन बार्शी उपविभागातील बार्शी शहर, बार्शी तालुका, वैराग, पांगरी व माढा पोलीस ठाणे अंतर्गत दिनांक 22 फेब्रुवारी पासून आजपर्यंत नियम न पाळणाऱ्यांकडून तब्बल साडेसात लाखाचा दंड वसूल केला आहे.
  बार्शी उपविभागातील बार्शी शहर हद्दीत 372600/- रुपये, बार्शी तालुका हद्दीत 103500/- रुपये, पांगरी हद्दीत 107000/- रुपये, वैराग हद्दीत 104800/- रुपये आणि माढा हद्दीत 56600/- रुपये असा 1710 केसेसच्या माध्यमातून दंड वसूल केला आहे.

बार्शी उपविभागातील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील जनतेने कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव न होणे करिता नेहमी मास्कचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळावे जेणेकरून एकमेकापासून कोरोना विषाणूचा प्रसार रोखून, दंडात्मक कारवाई टाळता येईल असे अवाहन उपविभागीय पोलीस आधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी केले आहे.

Leave a Reply