December 3, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

ट्रक-दुचाकी अपघात, दुचाकीस्वार ठार


बार्शी ;-
  बार्शी- लातूर बाह्यवळण रस्त्यावर ताडसौंदणे चौकात दुचाकी व मालवाहु ट्रकचा भिषण अपघात होऊन अपघातात तालुक्यातील गुळपोळी येथील शेतकरी दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाल्याचा आज रविवारी दि.9 सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडला.

Advertisement

Truck-biker accident, bike rider killed
   याबाबत अधिक प्राप्त माहिती अशी की मयत रामचंद्र बचुटे वय45 रा.गुळपोळी ता.बार्शी हे आज रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या ताडसौंदणे या ठीकाणी कामानिमित्त गेले होते. सदर ठिकाणाचे काम उरकून गुळपोळी या ठिकाणी येण्यासाठी निघाले होते.दरम्यान
ताडसौदणे येथुन बार्शीकडे दुचाकी क्रमांक MH 13 CA 5944 वरूण बार्शीकडे येत असताना, बी आय टी कॉलेज चौकामध्ये रस्ता ओलांडत असताना, कुर्डूवाडी कडून लातूर च्या दिशेने जाणाऱ्या MH 25 U 5779 या ट्रकच्या डाव्या बाजूच्या मागील टायर जवळ दुचाकीची जोरदार धडक बसली.अपघात एवढा भिषण होता कि या अपघातात दुचाकी चालक बचुटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.
  याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply