December 3, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पेट्रोल पंप देतो म्हणून कुसळंब येथील एकाची फसवणूक

बार्शी;- महाराष्ट्र स्पीड न्युज

इंडीयन ऑइल पेट्रोलियमचा पेट्रोल पंप देतो असे म्हणुन एका अनोळखी इसमाने एकाची 14 लाख रूपयांची फसवणुक केल्याचा प्रकार तालुक्यातील कुसळंब येथे घडला.याप्रकरणात एका अनोळखी इसमावर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

A person from Kusalamba was cheated by giving a petrol pump

@@योगेश विजय पाटील वय 25 वर्षे रा.कुसळंब ता. बार्शी यांनी याबाबत  फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की त्यांची कुसळंब हद्दीत शेती आहे. 12 मे 2021 रोजी फिर्यादी गुगलवरुन सर्च करुन इंडियन ऑईल पैट्रोलियम बाबत माहिती घेत असताना त्यांना फोन आला की, तुम्हाला पैट्रोल पंपासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्याबाबत माहिती तुम्हाला व्हटसअप वर पाठविली होती. फिर्यादीने त्यांना मागितलेली कागदपत्रे व्हटसअप नंबरला पाठविली. त्यानंतर त्यांना फोन आला की, तुमची कागदपत्रे दाखल करुन घेण्यासाठी लागणारी रजिस्ट्रेशन फि रक्कम 30,500/- रु ऑनलाईन पाठवा. त्यांनी मुंबई स्थित बँकेच्या खात्यावर रजिस्ट्रेशन फि रक्क्म 30,500/- रु ऑनलाईन पाठविली. त्यानंतर  कागदपत्रे कंपनीला पाठवुन दिलेबाबत ई-मेलवरुन माहिती कळविली. त्यानंतर आय.डी.एफ.सी बॅक शाखा- बांद्रा, मुंबईच्या  खात्यावर डिलरशिप मिळविण्यासाठी डिलरशिप फि 1,65,500/- रु पाठवुन दया असे सांगितल्याने त्यांना दिनांक 17/5/2021 रोजी 1,00,000/- रु व दिनांक 18 /5/2021 रोजी 65,500/-रु असे एकुण 1,65,500 /- रु पाठवुन दिले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीस डिलरशिप सर्टिफिकेट ऑनलाईन पाठविले.
त्यानंतर -बांद्रा (W) मुंबई या खात्यावर लायसन्ससाठी लागणारे लायसन्स फि 4, 25,200/- रु ऑनलाईन पाठविण्यास सांगितल्याने दि.19/5/2021 रोजी 1,00,000/- रु दिनांक 20/5/2021 रोजी 1,00,000/- रु, दिनांक 21/5/2021 रोजी 1,00,000/- रु दिनांक 22/5/2021 रोजी 1,00,000/- रु दिनांक 23/5/2021 रोजी 25,200/- रु ऑनलाईन पाठविले. त्यानंतर त्यांनी  ऑनलाईन लायसन्स पाठवुन दिले. त्यानंतर पुन्हा फिर्यादीस  YES Bank शाखा-बांद्रा (W) मुंबई च्या खात्यावर (अनामत) सिक्युरिटी डिपझिट रक्कम म्हणुन 7,74,500/- रु भरण्यास सांगितले होते ते पैसे दिनांक 25/5/2021 रोजी 74500/- रु दिनांक 26/5/2021 रोजी 1,00,000/- रु दिनांक 27/5/2021 रोजी 1,00,000/- रु दिनांक 28/5/2021 रोजी 1,00,000/- रु दिनांक 29/5/2021 रोजी 1,00,000/- रु, दिनांक 30/5/2021 रोजी 1,00,000/-रु, दिनांक 31/5/2021 रोजी 1,00,000/- रु दिनांक 1/6/2021 रोजी 1,00,000/- रु असे एकुण 7,74,500/- रु YES Bank शाखा-बांद्रा (W) मुंबई च्या खात्यावर ऑनलाईन पाठविले. त्यानंतर त्यांनी  अनामत रक्कम जमा केलेबाबतचे सर्टिफिकेट पाठविले. सदर इसमाचे YES Bank शाखा-बांद्रा (W) मुंबई च्या खात्यावर एकुण 13,95,700/- रु ऑनलाईन जमा केले आहे.
   फिर्यादीस सदरबाबत संशय आल्याने त्यांनी सोलापुर येथे इंडियन ऑईल सोलापुर येथील ऑफिसमध्ये जावुन चौकशी केली असता तेथील अधिका-यांनी त्यांना सांगितले की, आम्ही असे आम्ही ऑनलाईन पेमेंट घेत नाहीत व ऑनलाईन पध्दतीने लायसन्स देखील देत नाहीत.
त्यानंतर फिर्यादी पाटील यांची खात्री झाली की,  पेट्रोल पंप देतो असे म्हणुन त्यांची 13,95,700 /- रु ऑनलाईन फसवणुक झाली आहे.
   तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी इसमावर फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply