बार्शी तालुक्यातील पुरी येथे दहा दिवसात दुस-यांदा तेच दुकान फोडुण दोन्ही घटनेत तब्बल चार लाखाची चोरी
व्हिडिओ 👇
बार्शी ;
दहा दिवसापूर्वीच दुकानाचे शटर उचकटुन 1 लाख 70 हजार रूपयांचे सोयाबीन बियाने चोरून नेलेल्या पुरी ता.बार्शी येथील त्याच खत दुकानाचा पाठीमागील पत्रा उचकटुन तब्बल 2 लाख 20 हजार रूपये किंमतीचे सोयाबीनचे 73 कट्टे चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार आज शनिवारी उघडकीस आला आहे.या दुकानातील पहिल्या चोरीचा तपास सुरू असताना व एका चोरट्यास पहिल्या दुकान चोरी प्रकरणात ताब्यात घेण्यात आले असतानाच पुन्हा त्याच दुकानात दहा दिवसात दुस-यांदा मोठी चोरी झाली आहे.
#श्वानपथक व ठशे तंज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.मात्र श्वान माग काढण्यात अपयशी ठरले.सपोनी सुधीर तोरडमल यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
The same shop was burglarized for the second time in ten days at Puri in Barshi taluka.
सत्यशिव ऍग्रो एजन्सी,पुरी असे त्या दहा दिवसात दुस-यांदा चोरी झालेल्या दुकानाचे नाव आहे.
चोरट्यांनी दहा दिवसापूर्वी दि.3 जुनच्या पहाटे पुरी ता.बार्शी येथील याच खत दुकानाचे शटर उचकटुन रोख रक्कम सोयाबीनचे विविध कंपन्यांचे 90 कट्टे,ग्रॅन्डर व ड्रिल मशीन असा एक लाख सत्तर हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला होता.
अमर झालटे वय-29 वर्षे,रा-पूरी, ता- बार्शी यांनी पांगरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरूण तपास सुरू होता.चोरीप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्य़ातुन एकास ताब्यात घेण्यात आलेले होते.त्याचा तपास सुरू असताना व चोरटा पोलिसांच्या ताब्यात असतानाच पुन्हा त्याच खत दुकानावर चोरट्यांनी निशाना साधुन दोन लाखापेक्षा जास्त रकमेचे सोयाबीन बियानावर हात साफ केला आहे.
पांगरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण सिरसाट हे करत आहेत.