June 13, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

महाराष्ट्र माध्यमिक डी.एड. शिक्षक महासंघाचे लाक्षणिक आंदोलन ४० वर्षांपासून खाजगी माध्यमिक शाळांतील पदवीधर डी.एड. शिक्षकांवर अन्याय होत असून एक वर्ष उलटूनही अधिसूचनेची अंमलबजावणी नाही

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

            दि.८ जून २०२० च्या अधिसूचनेची एक वर्ष उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र माध्यमिक डी.एड. महासंघातर्फे  संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात आले. याबाबतची माहिती महासंघाच्या अध्यक्षा पद्मा तायडे, कार्याध्यक्ष नंदकिशोर गायकवाड,  महासचिव बाळा आगलावे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Advertisement

Maharashtra Secondary D.Ed. The symbolic movement of the teachers’ federation has been for 40 years in private secondary school graduates D.Ed. Teachers are being treated unfairly and the notification has not been implemented even after one year

      प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नंदकिशोर गायकवाड यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र खाजगी शाळा (कर्मचारी सेवेच्या शर्ती) १९८१ नुसार शालेय प्रशासन चालत असून गेल्या ४० वर्षांपासून खाजगी माध्यमिक शाळांतील डी.एड.शिक्षकांना मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळे केंद्रिय कार्यकारिणीची दूरदृश्य प्रणालीद्वारे २० मे रोजी पद्मा तायडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्वानुमते आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. शासनाच्या वेळकाढूपणाचा निषेध करून अधिसूचनेची अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे पद्मा तायडे यांनी सांगितले.
      महासंघाचे महासचिव बाळा आगलावे यांनी पदवीधर डी.एड. शिक्षकावर होत असलेल्या अन्यायाबाबत नाराजी व्यक्त केली. तर कार्याध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांनी शासनाने ८ जून २०२० रोजी अधिसूचना प्रसारित करून प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या ‌आशा पल्लवित केल्या. परंतु एक वर्ष लोटूनसुद्धा अंमलबजावणी होत नसल्याने महासंघाला आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले.
      महाराष्ट्रातील सर्वच विभागातून उपसंचालक यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. यामध्ये मार्गदर्शक दिनेश कुटे, उपाध्यक्ष विश्वनाथ मघाडे, राजेंद्र मसराम, कोषाध्यक्ष शहाबत हुसेन विभागीय सचिव काळूराम धनगर, लक्ष्मण राठोड, आर.डी. पाटील, दिलीप पवार यांनी नियोजन करून कार्यवाही केली. महाराष्ट्रातील अनेक पदवीधर डी.एड. शिक्षकांनी आपापल्या घरी राहून लाक्षणिक उपोषणात सहभागी होऊन काळ्या फिती लावून शासनाच्या शिक्षण विभागातून होत असलेल्या दिरंगाईचा निषेध नोंदवला.

Leave a Reply