बार्शी तालुक्यातील उंबर्गे येथे चोरट्यांनी मारला बोकडावर डल्ला,एकाच रात्रीत तिन ठिकाणी चो-या
बार्शी ;
बार्शी तालुक्यातील उंबर्गे येथे एकाच रात्रीत तिन ठिकाणी चो-या करूण बोकडे, मळणीयंत्र व पेरणीचे साहित्य लंपास केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
दत्तात्रय ऐजिनाथ विधाते वय – 35 वर्षे रा. उंबर्गे ता. बार्शी या शेतक-याने तालूका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.Thieves kidnapped goats at Umberge in Barshi taluka, three places in one night
त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांनी घरगुती वापरण्या करीता गत वर्षा पुर्वी एक धरती कंपनीचे पेरणी यंत्र विकत घेतलेले होते.
रात्रौ 08.00 चे सुमारास ते शेतातील गोठ्यात सदर पेरणी यंत्र लावुन घरी आले होते. त्यानंतर ते जेवन करुन झोपले व सकाळी
07.00 वाजण्याच्या सुमारास ते झोपेतुन उठुन शेतात गेले असता गोठ्यात लावलेले पेरणी यंत्र दिसुन आले नाही.
उंबर्गे व आजुबाजुचे परिसरात शोध घेतला परंतू ते मिळून आले नाही. त्यामुळे 25 हजार रूपये किंमतीचे पेरणी यंत्र चोरीस गेल्याची खात्री झाली.
त्यानंतर चोरट्यांनी शेजारील निवृत्ती विधाते यांच्या मालकीची गोठ्यात बांधलेली विस हजार रूपये किंमतीची बोकडे चोरून नेली.चोरट्यांनी जाताना एका शेतक-याचा कुळवही पळवला.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.