June 14, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

आयटक  शिक्षकेतर संघटनेकडून 7 व्या वेतन आयोगासाठी राज्यव्यापी अंदोलनाची हाक

बार्शी ; आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतिने शिक्षकेतरांना आश्‍वासित प्रगतीयोजनेचे 12 व 24 वर्षांचे रद्द झालेले शासन आदेश पुर्नजिवीत करून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा व 7 व्या वेतन अयोगाचा लाभ विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतरांना तातडीने द्या हि मुख्य मागणी घेवून राज्यातील महाविद्यालय कर्मचारी बांधवांनी लढ्याची हाक दिली आहे.

State-wide agitation call for 7th pay commission from ITC non-teaching organization

दिनांक 21 जून ते 26 जून 2021 छत्रपती शाहू महारांच्याजयंती पर्यंत मागणी सप्ताह करून या काळात महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी हातात पोस्टरधरून फोटो काढून ते फोटो मा. मुख्यमंत्री,  मा. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री,  मा. उपमुख्यमंत्री,  मा. संचालक व सहसंचालक उच्च शिक्षण यांना मेल, फेबसबुकला, टिव्टर ला टॅग व मेसेज करतील  या अंदोलनास राज्यभरातील महाविद्यालय शिक्षकेत कर्मचारी उत्फुर्त प्रतिसाद देतील.  तसेच पूढे हे अंदोलनसातवा वेतन आयोग मिळेपर्यंत खिशाल काळ्या फिती लावणे,  लाक्षणीक उपोषण, निदर्शेने अंदोलन या मार्गाने पूढे जाईल.  शासनाने हे अंदोलन कर्मचारीवर्गावर लादले आहे.  उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षकेर या महत्वाच्या घटकाकडे दुर्लक्ष केल्याने ते तिव्र नाराजी या अंदोलनातून व्यक्त करतील व आपले हक्कमिळवितील हे अंदोलन लोकशाही मार्गाने पूढे जात राहील अशी माहिती आयटकचे नेते व संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांनी दिली आहे.

संघटनेचे कॉम्रेड तानाजी ठोंबरे ए. बी. कुलकर्णी, कॉम्रेड प्रविण मस्तुद, आरती रावळे,उमेश मदने,  विलास कोठावळे,हणुमंत कारमकर यांच्या निवेदणावर सह्या आहेत.

Leave a Reply