June 12, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

“कोण होणार महाराष्ट्राचा शिववक्ता या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर” जळगावची हंसिका महाले व रायगडची श्रावणी गोरेगावकर यांचे यश

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून बार्शीतील शाळा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या
“कोण होणार महाराष्ट्राचा शिववक्ता” या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
झाला असल्याची माहिती संयोजक प्रतापसिंह मोहिते यांनी दिली.

Advertisement

Hansika Mahale of Jalgaon and Shravan Goregaonkar of Raigad succeed in announcing the results of the state level oratory competition


इयत्ता १ ली ते ४ च्या गटात जळगावची हंसिका नरेंद्र महाले ही प्रथम विजेती
ठरली.द्वितीय-श्रद्धा सचिन खोत (कोल्हापूर), तृतीय-समृद्धी संदीप कारखेले (रायगड), उत्तेजनार्थमफिरा अमीर मुलाणी(सोलापूर)व प्रियदर्शिनी दिलीप हाके(सांगली) हे विजेते ठरले.
इयत्ता ५ वी ते ८ वी च्या गटात रायगडची श्रावणी सुनील गोरेगावकर ही प्रथम
विजेती ठरली. द्वितीय-वैष्णवी वसंत कंक(पुणे),तृतीय-समृद्धी संजय भोसले(सोलापूर),उत्तेजनार्थशरयुक्ता शरद येडके(सोलापूर) व वेदांत रमेश ठाणगे(अहमदनगर) हे स्पर्धेत विजेते ठरले.
कोरोना संकटामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला
व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व राजमाता जिजाऊंचे संस्कार हे
समाजापुढे भाषणाच्या माध्यमातून येण्यासाठी या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या
राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून एकूण 742 स्पर्धकांनी
सहभाग नोंदविला होता. या सर्व स्पर्धकांची भाषणे राज्यभरातून व देशभरातून दीड लाख लोकांनी
पाहिली असल्याची माहिती मोहिते यांनी दिली. सर्व विजेत्या स्पर्धकांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
शाळा बंद असल्या तरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असून त्यांच्या सुप्त गुणांना
वाव देण्याच्या उद्देशाने व त्यांचे नेतृत्व व वक्तृत्व कौशल्य ऑनलाइनच्या माध्यमातून समाजापुढे
आणण्यासाठी शाळा फाऊंडेशनने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला होता.

विद्यार्थी हिताचे नवनवीन प्रयोग,उपक्रम,विविध स्पर्धा यापुढील काळातही संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याचा मानस आहे.
– प्रतापसिंह मोहिते, शाळा फाउंडेशन,बार्शी जि-सोलापूर.

Leave a Reply