June 14, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन,व्यथा पोलीस पाटलांची..

लेखन✍  वैभव माळी-पाटील

गत वर्षी भारतामध्ये कोरोना सारखी महामारी आली आणी सर्व प्रशासकीय व राजकीय यंत्रणा कामाला लागली.या महामारी ला अटकाव करण्यासाठी राज्यशासनाने ग्रामस्तरावर ग्रामस्तरीय कोरोना समिती स्थापन करण्याचे आदेश दिले.या समिती चा अध्यक्ष तलाठी व सचिव ग्रामसेवक यांना नेमले.

Advertisement

Karmanyevadhikaraste Maa Faleshu Kadachan, Vyatha Police Patlanchi.

या समिती मध्ये सदस्य म्हणून पोलीस पाटील,सोसायटी सचिव,मंडळ कृषी अधिकारी यांना सदस्य म्हणून नेमले.वास्तविक पाहता या समिती मध्ये गावात कायम रहिवाशी फक्त पोलीस पाटील होते.त्यामुळे सर्व जबाबदारी पोलीस पाटील यांना पार पाडावी लागत असे.त्यावेळी बाहेरून गावी आलेल्या लोकांना संस्थात्मक विलीगिकरण करावे लागत असे.यावेळी गावात समिती मधील कोणीही हजर नसे त्यामुळे रात्री अपरात्री आलेल्या लोकांना जिल्हा परिषद शाळेत विलीगिकरण करण्याची तारेवरची कसरत पोलीस पाटील करत असत.कित्येक पोलीस पाटील यांना यावेळी लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असे.गावात एखादा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्या रुग्णाच्या संपर्कातील लोकांना टेस्ट साठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्याचे काम देखील पाटलांना कर्मचार्यांनाच्या सोबत करावे लागत असे.या पहिल्या लाटेच्या वेळी सर्व पाटलांना भरपूर समस्यांना तोंड द्यावे लागले.पहिली लाट संपुष्टात आली आणि हळूहळू गावातील लोकांचा राग पटलांवर वेगवेगळ्या मार्गाने निघू लागला.”तुम्ही आम्हाला कोरोना काळात खूप त्रास दिला,आम्हाला शाळेत विलीगिकरण मध्ये तुमच्या मुळे राहावे लागले,आम्हाला दुकान उघडू दिले नाही,मास्क वापरायला लावले,गावात विनाकारण फिरू नका म्हणून रुबाब केलात.”असे एक नाही अनेक प्रश्न लोक करू लागले व पोलीस पाटील यांना त्याला तोंड द्यावे लागले.बघत बघत दुसरी लाट आली अन पुन्हा पाठीमागच्या गोष्टी विसरून पोलीस पाटील कामाला लागले.टेस्ट कॅम्प आयोजित करणे,ट्रेसिंग करणे,लॉकडाऊन नुसार गावातील दुकाने व इतर ठिकाणी गर्दी जमणार नाही याची काळजी घेणे.हे होतें होते तेच लसीकरण सुरू झाले. यात देखील आम्ही काम केली.सुरवातीला लोक लस घ्याल धजत नव्हते.त्यांना आम्ही वेळोवेळी जाऊन लसीकरण फायदे तसेच त्यांच्या मनातील लस विषयक भीती कमी करण्याचे म्हणजे जनजागृती चे काम आम्ही केले.वरील एवढा शब्द प्रपंच करण्याचे कारण म्हणजे एवढे सर्व करून देखील प्रशासनाने पोलीस पाटील यांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून वागणूक नाही दिली.प्रशासन असो की राज्य सरकार या दोघांनी देखील पोलीस पाटील यांचा कोठेही उल्लेख नाही केली.आम्हाला माहिती आहे की आमच्या पेक्षा जास्त डॉक्टर,नर्सेस,आशा वर्कर यांनी योगदान दिले परंतु आम्ही देखील त्यांच्या साथीने योगदान दिले हे विसरता येणार नाही.कित्येक पोलीस पाटील यांचा कोरोना मुले मृत्यू झाला.आमच्या एका महिला पोलीस पाटील भगिनी यांनी एका राजकीय पुढऱ्या ला गर्दी करून वाढदिवस करू दिला नाही म्हणून  कितीतरी संकटाला सामोरे जावे लागले.राजकीय दबावापोटी त्या महिला पोलीस पाटील यांना निलंबित देखील करण्यात आले.आज पोलीस पाटील म्हणून नेमणूक झालेल्या व्यक्ती या उच्च शिक्षित आहेत.पूर्वी च्या वंशपरंपरागत पोलीस पाटील सारख्या त्यांना जमिनी व इस्टेट नाहीत.सर्व सामान्य शिक्षित तरुण आज पोलीस पाटील म्हणून तुटपुज्या मानधन वर काम करतोय.शासनाने पोलीस पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याची कदर म्हणून त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून योग्य ती वागणूक द्यावी.पोलीस पाटील यांच्या अधिनियमात दुरुस्ती करावी याच अपेक्षा पोलीस पाटील बांधवांच्या आहेत. पोलीस पाटील यांना महसूल विभागाने विचारले ना पोलीस प्रशासनाने विचारले.बिचारे पाटील आपले गावाप्रति प्रेम,कर्तव्य समजून आपले कार्य करत राहिले.एवढे सर्व करून देखील शासन स्थरावर पोलीस पाटील यांना कोणीच वाली नाही याची सल आज आम्हाला जाणवते.आमच्या कार्याची कुठं तरी दाखल घ्यावी हीच अपेक्षा.
                        लेखन
              वैभव माळी-पाटील
              पोलीस पाटील नारी ता.बार्शी

Leave a Reply