June 7, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने कोरोना फ्रंट वर्कर्सचा फूड पॅकेट देऊन गौरव

बार्शी ः महाराष्ट्र स्पीड न्युज

कोरोना आपत्तीच्या काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा देणार्‍या आशा वर्कर्स, गट प्रवर्तक व आरोग्य कर्मचार्‍यांचा पाठीवर कौतुची थाप मिळावी त्यांना भविष्यात आरोग्य सेवा आणखी गतीमान करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून इंडीयन रेडक्रॉस सोसायटी बार्शी शाखेच्या वतीने फूड पॅकेट देण्याचा स्तुस्त्य उपक्रम राबविल्याचे गौरवोदगार बार्शी रेडक्रॉसचे पदसिध्द अध्यक्ष तथा तहसिलदार सुनील शेरखाने यांनी काढले.  

Advertisement

On behalf of the Barshi Red Cross Society, Corona Front Workers were honored with a food packet
सोमवारी (ता.7) सकाळी श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या स्व.द.ग.कश्यपी सभागृहात रेडक्रॉस सोसायटी शाखा बार्शीच्या वतीने कोरोना काळात आरोग्य सेवा देणार्‍या फ्रंट लाईन वर्कर्सना प्रातिनिधीक स्वरपात फूड पॅकेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष अ‍ॅड.असिफ तांबोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक ढगे, बार्शी ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ.शीतल बोपलकर,  रेडक्रॉस बार्शीचे उपाध्यक्ष व संयोजक अजित कुंकूलोळ, संचालक धनुभाई शाह, डॉ. बाळासाहेब देशपांडे, प्रा.दिलीप कराड, अशोक डहाळे उपस्थित होते.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील आरोग्य क्षेत्रातील आशा वर्कर्स, गट प्रवर्तक, परिचारिका, परिचर, तसेच आरोग्य कर्मचार्‍यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक करत रेडक्रॉस सोसायटीने नेहमीच आपदकालीन परिस्थितीत समाजीतल घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचेही यावेळी तहसिलदार शेरखाने यांनी सांगितले. डॉ.ढगे म्हणाले, शहर व तालुक्यातील कोरोना काळात जीवाची पर्वा न करता मानधनतत्वावर काम करणार्‍या आशा वर्कर्स व प्रवर्तकांना रेडक्रॉसने दिलेल्या फूड पॅकेट मुळे उर्जा मिळाली आहे. ही ऊर्जा त्यांना भविष्यात अधिक जोमाने काम करण्यास निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल. नगराध्यक्ष तांबोळी यांनी रेडक्रॉस सोसायटीने मानवतेच्या दृष्टीने आपदकालीन काळात कार्यरत असलेल्या घटकांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत रेडक्रॉस सोसायटीच्या सामाजिक कार्याचा आदर्श अन्य संस्थांनी घ्यावा असे आवाहन केले. तर डॉ.बोपलकर यांनीही रेडक्रॉस सोसायटीच्या उपक्रमाचे यावेळी कौतुक करत संयोजकांचे आभार मानले. प्रास्ताविकात कुंकूलोळ यांनी इंडीयन रेडक्रॉस सोसायटी बार्शीच्या मागील चाळीस वर्षातील विविध सामाजिक उपक्रमांची यावेळी माहिती दिली. तसेच कोरोना काळात आरोग्य कर्मचार्‍यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दिल्ली रेडक्रॉसच्या माध्यमातून केनिया सारख्या छोट्या देशाने कोरोना फ्रंट वर्कर्सना फूड पॅकेट देऊन मदतीचा हात दिल्याचे सांगितले. भविष्यातही रेडक्रॉस नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यास कटीबध्द असल्याची ग्वाही दिली. आभार अशोक डहाळे यांनी मानले.
चौकट ः केनिया देशाकडून चहा,कॅफी व शेंगदाने तसेच गुळ असा स्वरूपात फूड पॅकेटचे शहर व तालुक्यातील सुमारे 250 आरोग्य कर्मचार्‍यांना रेडक्रॉस बार्शीच्या वतीने वाटप करण्यात आले

Leave a Reply