म्युकर मायकोसिस रुग्णाच्या क्लिनिकल सॅम्पल मध्ये आढळले कॅन्डीडीयासिस बरोबर प्रथमच फ्युजँरिओसीस व अल्टरनेरियासिस या दुर्मिळ रोगाचे बुरशीजन्य जिवाणूं
पोस्ट कोविड रुग्णांमध्ये पहिल्यांदाच ‘मल्टिपल फंगल रेअर मिक्स इन्फेक्शन’ आढळल्याचा ,सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांचा दावा
बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
पोस्ट कोविड रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस ची संख्या वाढत असतानाच म्युकर मायकोसिसच्या रुग्णांच्या क्लिनिकल सॅम्पल मध्ये ‘मल्टिपल फंगल रेअर मिक्स इन्फेक्शन’ ला कारणीभूत बुरशीजन्य जीवाणूं पहिल्यांदाच आढळल्या चा दावा बार्शी येथील सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी व संशोधिका सौ अमृता शेटे मांडे यांनी केला आहे.
रुग्णाच्या क्लिनिकल सॅम्पल चे संशोधन चालू असताना त्यामध्ये अस्परजीलॉसिस व कॅन्डीडीयासिस बरोबर दुर्मिळ अशा फ्युजँरिओसीस आणि अल्टरनेरियासिस या रोगांचे बुरशीजन्य जीवाणूं आढळल्याचे सौ अमृता शेटे मांडे यांनी सांगितले.
Mucous mycosis was found in a clinical sample of a patient with candidiasis, a fungal bacterium of the rare disease fusariosis and alternareasis for the first time.
क्लिनिकल सॅम्पल मधिल जंतूंचा अभ्यास करण्यासाठी असे जंतू पोषक आहार माध्यमात वाढवावे लागतात.अशा प्रकारे सर्व घटक योग्य प्रमाणात देऊन आम्ही जेंव्हा बुरशी वाढविण्याचा प्रयोग केला तेव्हा एका मागून एक वेगवेगळ्या बुरशींची वाढ झाल्याचे पाहून आम्ही चक्रावून गेल्याचे डॉ कुलकर्णी यांनी सांगितले.
आढळलेल्या बुरशींपैकी फ्युजँरिओसीस व अल्टरनेरियासिस यारोगांच्या बुरशींच्या माणसात झालेल्या संसर्गाची फारच कमी उदाहरणे आहेत. त्यामुळेच त्यांची गणना दुर्मिळ प्रकारात होते.आज पर्यंत पोस्ट कोविड रुग्णात अशा प्रकारच्या मल्टिपल फंगल रेअर मिक्स इन्फेक्शन मधिल दुर्मिळ बुरशी आढळल्याचा हा पहिलाच रिपोर्ट असल्याचा दावा डॉ सुहास कुलकर्णी यांनी केला आहे.
म्युकर मायकोसिस च्या रुग्णात दुर्मिळ अशा बुरशींच्या पहिल्यांदाच केलेल्या नोंदी मुळे ऑपरेशन करणाऱ्या व उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा दृष्टिकोन बदलणार असून त्याचा फायदा रुग्णांनाच होणार आहे असेही डॉ कुलकर्णी यांनी नमूद केले.
क्लिनिकल सॅम्पल मध्ये पहिल्यांदाच एकत्रित आढळलेल्या बुरशी याप्रमाणे
सॅम्पल क्रं १ : म्युकर, कॅण्डीडा व फ्युजँरियम
सॅम्पल क्रं २ : म्युकर, कॅण्डीडा, अस्परजिलस व अल्टरनेरिया.
आढळलेल्या बुरशींची माहिती याप्रमाणे
कॅण्डीडीआसिस हा रोग कॅण्डीडा या संधीसाधू यीस्ट जीवांणूमुळे होतो. या यीस्टच्या २००प्रजाती असून फक्त ६ प्रजाती मानवामध्ये रोग कारक आहेत.यीस्ट २ ते ४ मायक्रॉंन चे अंडाकृती आकाराचे असून म्युकर मायकोसिस झालेल्या रुग्णांमध्ये कॅण्डीडा अलंबिकान्स ही प्रजाती आढळून येत असून त्याची खात्री जर्म ट्यूब टेस्ट करून करता येते.या रोगात नाकाजवळच्या पोकळ्या मध्ये नेक्रॉसिस ची शक्यता बरोबर हाडांचा दाह, तोंडात पांढरे चट्टे तसेच रक्त ,डोळे व मेंदूला संसर्गाची शक्यता असते.
अल्टरनेरियासिस हा रोग अल्टरनेरिया या संधीसाधू जीवाणूंमुळे होतो.या जंतूंच्या २९९प्रजाती असून ४-५फक्त मानवामध्ये दुर्मिळ रोगकारक प्रजाती म्हणून समजल्या जातात.या जिवाणूंचे मायसेलिया २० ते २०० मायक्रॉन चे व मल्टीस्पोअर्स हे क्लब च्या आकारात असून ६८ मायक्रॉन एवढे मोठे असतात.जीवाणू हे मोठ्या आकाराचे असल्याने ब्लॉकेज व नेक्रॉसिस लवकर आणि जास्त प्रमाणात होते.कमी झालेली प्रतिकारशक्ती, एच आय व्ही संसर्ग ,बोन म्यारो तसेच किडनी ट्रान्सप्लांट, ऍलर्जी या गोष्टी या रोगाच्या संसर्गाला प्रामुख्याने कारणीभूत असतात.हे जंतू संसर्गा नंतर नाकाच्या पोकळीतील अस्तरला दाह ,
डोळ्या च्या बाहुलीचा पुढील पारदर्शक पडदा व चेहऱ्याच्या हाडांना इजा पोहचवू शकतात.
फ्युजँरिओसीस हा रोग फ्युजँरियम या बुरशीजन्य जीवाणूंमुळे होतो. या जंतूंच्या २० प्रजाती असून फक्त ३ प्रजाती मानवामध्ये दुर्मिळ रोगकारक प्रजाती समजल्या जातात.या जिवाणूंचे ४ ते ५ स्पोअर्स एकत्र असे केळ्याच्या आकाराचे दिसतात व ते ७ ते ३५ मायक्रॉन एवढे असू शकतात.कमी झालेली प्रतिकारशक्ती, अचानक झालेली पेशींची हानी तसेच चुकीचे अवयव रोपण या गोष्टी या रोगाच्या संसर्गाला कारणीभूत ठरू शकतात.हे जंतू डोळ्याच्या आतील पोकळी मधील दाह,दृष्टी जाणे, हाडे व स्नायुंना इजा तसेच एलर्जीस कारणीभूत असून त्यांच्या पासून तयार होणारे विष आतड्याच्या पेशींना मोठी हानी पोहचवू शकते.
वाढते बुरशीजन्य रोग लक्षात घेता रुग्णांनी त्यांच्या नाकातील,घशातील, कानातील, डोळ्याच्या, चेहऱ्याच्या कुठल्याही नवीन लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे डॉ कुलकर्णी यांनी खास नमूद केले आहे
कोण आहेत संशोधक:
डॉ सुहास कुलकर्णी हे निवृत्त प्रोफेसर असून सूक्ष्मजीवशास्रज्ञ आहेत.ते आदर्श शिक्षक तसेच बार्शीविज्ञानरत्न पुरस्काराचे मानकरी आहेत.दोन विद्यापीठांचे सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे मार्गदर्शक असून दोन संशोधकांची एम फील,सात जणांची पीएचडी, १४ पुस्तकातील लिखाण, ५०पेक्षा अधिक रिसर्च पेपर्स व १५ शोध त्यांच्या नावावर जमा आहेत
सौ अमृता शेटे मांडे या सूक्ष्मजीव शास्त्राच्या अभ्यासिका असून पीएचडी करत आहेत तसेच त्या नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हाॅस्पिटल (NDMCH), बार्शी, सोलापूर.या ठिकाणी कार्यरत आहेत