बार्शी तालुक्यातील घाणेगाव शिवारात शेतमालकालाच दोघांनी दिली शेतात आल्यास हातपाय तोडण्याची धमकी
बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
शेतात आलेल्या शेतमालकास शेजारच्या शेतक-याने व त्याच्या पत्नीने शिवीगाळी करून तु जर शेतात आला तर तुझा पाय मोडीन अशी धमकी दिल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील घाणेगाव शिवारात घडला.
Both of them threatened to break their limbs if they came to the farm in Ghanegaon area of Barshi taluka
#रघूनाथ धिमधिमे व संगीता धिमधिमे दोघे रा. घाणेगाव ता.बार्शी अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
#मुकुंद पवार, वय 49 वर्षे, रा. घाणेगाव, ता. बार्शी, सध्या रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते पनन संचलनालय, पुणे येथे नोकरी करतात.
घाणेगाव, ता. बार्शी, येथे त्यांची जमीन असून ती त्यांचा भाऊ महेश भास्कर पवार हा करतो सदरची जमीन गावातील सोपान लक्ष्मण धिमधिमे यांचेकडून 2020 मध्ये खरेदी केलेली आहे.
ते कुटूंबातील व्यक्तींना भेटण्याकरीता आले होते. काल दि. 06/06/2021 रोजी दुपारी 2 वाजता ते स्वतःचे शेतात गेले असता शेताशेजारी असलेले रघूनाथ धिमधिमे व त्याची पत्नी संगीता धिमधिमे हे बैलाचा कुळव घेवून त्यांच्या शेतात आले होते व त्यांनी शेतात लावलेली गवारीचे पिक कुळवून गवारी पिकाचे नूकसान केले.
फिर्यादीने त्याबाबत त्यास विचाणा केली असता तो म्हणाला कि, सदरची जमीन हि आमची असून वडीलांनी केलेला व्यवहार मला मान्य नाही. असे म्हणून त्याची पत्नी व त्याने शिवीगाळी करून तु जर शेतात आला तर तुझा पाय मोडीन अशी धमकी देवून निघून गेले आहेत.
वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.