अमेरिकेतील ब्रीद इंडिया फंडच्या वतीने बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठान ला तीन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन प्रदान देशात आतापर्यंत 204 मशीन पाठवल्या-अध्यक्ष डॉ बालाजी आगलावे
बार्शी: महाराष्ट्र स्पीड न्युज
भारतातील अमेरिकेत कार्यकत असलेल्या सुपुत्राच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या ब्रीद इंडिया फंडच्या माध्यमातून देशभरात 204 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशिन्स देण्यात आल्या आहेत. याच फंडच्या माध्यमातून बार्शीतील मातृभूमी प्रतिष्ठान ला तीन मशिन्स आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते देण्यात आल्या.
The Breath India Fund in the United States has donated three oxygen constructor machines to Barshi Mathrubhumi Pratishthan and has sent 204 machines to the country so far: Dr. Balaji
यापूर्वीही मातृभूमी ला चार मशिन्स मिळाल्या आहेत.कळंब तालुक्यातील येरमाळा येथील सुपुत्र व अमेरिकेत फ्लोरिडा येथे कृषी शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ बालाजी आगलावे यांच्या माध्यमातून या मशीन आल्या आहेत. बार्शीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मातृभूमी प्रतिष्ठान ला या मशिन्स देण्यात आल्या. पोस्ट कोविड रुग्णसाठी या मशीन मोफत दिल्या जाणार आहेत.
यावेळी आमदार राजेंद्र राऊत, येरमाळा पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष पाटील,सिंधुताई आगलावे,सूर्यकांत बेदरे,श्रीपाद पांगारकर, प्रमोद पाटील, मातृभूमी चे अध्यक्ष संतोष ठोंबरे, संचालक डॉ लक्ष्मीकांत काबरा,मीना काबरा, डॉ अपूर्वा काबरा, अशोक हेड्डा, अजित कुंकुलोळ, शहाजी फुरडे-पाटील, मंदार कुलकर्णी, प्रशांत खराडे आदी उपस्थित होते.
आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, कोविड होऊन गेलेल्या रुग्णांना पुढील काही दिवस ऑक्सिजन आणि कॉन्स्ट्रेटर मशिन्स ची गरज आहे. त्यासाठी मातृभूमी ने सुरू केलेली ऑक्सिजन बँक ही संकल्पना रुग्णसाठी जीवदान देणारी आहे.या मशिन्स मुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करत. डॉ बालाजी आगलावे यांनी आपल्या भागासाठी आणखी भरीव मदत करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले.
आपण आपल्या माणसाचं आणि आपल्या देशाचे काहीतरी देणे लागतो.या उदात्त भावनेतून आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली.यापुढील काळात ही ब्रीद इंडियाफंड च्या माध्यमातून भारतासाठी चालू ठेवणार आहोत. आतापर्यंत देशात 204 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन देण्यात आल्या असल्याने फंड चे अध्यक्ष डॉ बालाजी आगलावे यांनी अमेरिकेतून बोलताना सांगितले.
अशोक हेड्डा म्हणाले की या मशिन्स गरजू लोकांना वापरासाठी दिल्या जातील. येरमाळा करांनी आमच्या प्रतिष्ठाण ची यासाठी निवड केल्याबद्दल विशेष आभार मानले. सूत्रसंचालन श्रीपाद पांगारकर यांनी केले. तर आभार अजित कुंकुलोळ यांनी मानले