बार्शी तालुक्यातील घोळवेवाडीत खरकटे पाणी टाकण्यावरूण तिघांना मारहाण
बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
घराकडे खरकटे पाणी टाकण्याच्या व चौकशी केल्याच्या किरकोळ कारणावरून चौघांनी मिळुन तिघांना दगड व काठीने मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील घोळवेवाडी येथे घडला.
#साहेसराव घोऴवे , राजु घोऴवे , सुरज घोऴवे व गंगाबाई घोऴवे सर्व घोऴवेवाडी ता बार्शी अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
Three persons were beaten up for pouring water in Gholvewadi in Barshi taluka
#बापुराव घोळवे,आशाबाई घोळवे व अर्चना घुगे अशी मारहाणीत जखमी झालेल्याची नावे आहेत.
#बापुराव घोऴवे, वय 65 वर्षे, रा घोऴवेवाडी, ता बार्शी यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.ते घरी गेले असता पत्नी आशाबाई व मुलगी अर्चना यांना भावकीतील गंगाबाई व तिचे मुले सुरज व राजु हे शिवीगाऴी करून मारहाण करत होते त्यावेऴेस त्यांनी त्यांना मारहाण का करता असे विचारले असता ते मला म्हणाले की तुझ्या घरच्यांनी आमच्या घराकडे खरकट पाणी का टाकले आहे. शिवीगाळ करू लागले त्यावेऴी साहेसराव घोळवे यांनी खाली बसुन मला फेकुन दगड मारू लागला त्याच वेऴी सुरज घोऴवे यांनी त्यांचे हातातील दगडाने डोकीत,पायावर,हातावर मारले व राजु घोऴवे यांनी काठीने डावे पायावर,छातीवर,हातावर मारून जखमी केले त्यावेऴेस माझी मुलगी अर्चना व आशाबाई अशा दोघीजणी सोडवण्यास आले असता सुरज घोऴवे याने माझ्या मुलीला डावे हातावर व पाठीवर दगडाने मारले व पत्नीला गंगाबाई घोऴवे हिने लाताबुक्याने मारहाण केली.त्यावेऴी माझ्या डोक्यातुन जास्त रक्त श्राव होवुन ते बेशुध्द पडले त्यावेऴी आम्हाला मारहाण करणारे सर्व लोक शिवीगाऴ करत पुन्हा आमच्या नादी लागला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवुन तेथुन निघुण गेले.